Michael Lobo Meets Pramod Sawant over OBC Reservation Dainik Gomantak
गोवा

ओबीसी आरक्षणासाठी लोबोंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

पणजीत शासकीय निवासस्थानी घेतली भेट

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात सध्या पंचायत निवडणुका आणि त्यातील ओबीसी आरक्षणाचा विषय जोरदार चर्चेत आहे. याच मागणीसाठी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी काल बुधवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ओबीसी उमेदवारांना न्याय देण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत साळगावचे आमदार केदार नाईक उपस्थित होते. (Michael Lobo Meets Pramod Sawant over OBC Reservation)

राज्यात सध्या पंचायत निवडणुकांचे वारे वाहात असून या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांच्या आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने 10 मे आणि 17 मे रोजी दोन स्वतंत्र निकाल दिले आहेत. या निकालानुसार ओबीसींना आरक्षण देताना मागासलेपणाचे निकष तपासले जावेत आणि यासाठी स्वतंत्र इतर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी, असे म्हटले आहे.

या आयोगामार्फत ओबीसींचा साकल्याने अभ्यास करून माहिती गोळा करावी आणि त्याआधारेच आरक्षण देण्यात यावे. अन्यथा ओेबीसींना आरक्षण न देता खुल्या वर्गातून त्यांना निवडणूक लढवण्यास सांगावे आणि आरक्षित प्रभाग खुले करावेत, असे म्हटले आहे. या निकालाचा आधार घेत विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि आमदार केदार नाईक यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

दरम्यान कोणत्याही परिस्थितीत राज्यातील ओबीसींवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. त्यांना 27 टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे, तो त्यांचा न्याय्य हक्क आहे. या मागण्यांसाठीच मी मुख्यमंत्र्यांना भेटलो असून याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. ते ओबीसींना न्याय देतील, असा विश्वास मायकल लोबो यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT