Michael Lobo News Dainik Gomantak
गोवा

...म्हणुन लोबो प्रकरण माध्यमांत गाजत आहे; जोशुआ डिसोझा

जोशुआ डिसोझा : प्रसिद्ध व्यक्तीची दिसते कारवाई

दैनिक गोमन्तक

म्हापसा: जर कागदपत्रे व्यवस्थित असल्यास, कुणालाच घाबरण्याची गरज नसते. परवानगीशिवाय कामे केल्यास व्यक्ती अडचणीत येणारच. विरोधी पक्षनेते मायकल लोबो हे विरोधी पक्षनेते असल्याने त्यांच्यावरील कारवाई लोकांना प्रकर्षाने दिसते. अशा प्रकरणांत इतरांवर देखील कारवाई होत असते. मात्र, ते माध्यमांमध्ये झळकत नाहीत.

(Michael Lobo Hotel Case)

लोबोंना हेतुपुरस्सर लक्ष्य केले जात नाही, इतरही याच चौकशीतून जातात. परंतु, लोबो हे प्रमुख व्यक्ती असल्याने ते जास्त माध्यमांत झळकताहेत, अशी प्रतिक्रिया म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी दिली.

हा काही मोठा गुन्हा नसतो. इतर स्थानिकही अशा रेस्टॉरंटच्या परवाना नूतनीकरणाच्या कारवाईंना सामोरे जातात. अनेकदा परवाने नूतनीकरण करण्याचे राहून जाते, परंतु मायकल लोबो हे विरोधी पक्षनेते असल्यानेच सध्या हे प्रकरण माध्यमांत गाजत असल्याचे स्पष्टीकरण जोशुआ डिसोझा यांनी दिले. मंगळवारी म्हापशात ते माध्यमांशी बोलत होते.

कायदा हा सर्वांसाठी समान असतो. त्यामुळे सरकार कुणालाच निवडक लक्ष्य करीत नाही. मुळात सर्व रेस्टॉरंटवाल्यांनी कायद्याचे पालन करून व्यवसाय करावा. जर तक्रार आल्यास संबंधित प्राधिकरणाला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार असतो, असेही ते म्हणाले.

‘लोबोंनी भाजप सोडणे ही त्यांची रणनीती’

विरोधी पक्षनेता भाजपात येणार आहे की नाही, याची मला कल्पना नाही. त्यांना भाजपात यायचेच होते, तर ते पक्षातून गेले कशाला? मुळात मायकल लोबोंना भाजपात येण्यास पक्षाची परवानगी हवी. लोबो हे वरिष्ठ राजकारणी असून, ते भाजापात राहिले असते, तर मोठ्या पदावर असते. लोबोंनी भाजपा सोडणे ही त्यांची रणनिती होती. मला त्यावर भाष्य करायचे नाही. जेव्हापासून लोबो हे आमदार बनले, ते नेहमीच सत्तेवर राहिल्याचे जोशुआ डिसोझा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Apple प्रेमींसाठी आनंदाची बातमी! iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max आणि iPhone Duo च्या किमती समोर; भारतात कधीपासून सुरू होणार विक्री?

'भावना कशा स्पष्ट करणार?' पुतळ्याच्या मुद्द्यावर गोवा सरकारची कोर्टात कानउघाडणी; याचिका मागे घेण्यासही खंडपीठाचा स्पष्ट नकार

VIDEO: "इंग्लंडमध्ये खेळण्याची लायकी नाही...", पाकिस्तानची अक्षरशः नाचक्की! खराब फलंदाजीनंतर संघातीलच खेळाडूचा घरचा आहेर

Government Scheme: गोव्यातील महिलांसह गरजू घटकांना मोठा दिलासा! गृहआधार आणि 'दयानंद' योजनेच्या मासिक मदतीत वाढ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Porvorim Elevated Road: म्हापसा-मडगाव आता अर्ध्या तासात! पर्वरी उन्नत मार्गाचे नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन, गुरुवारपासून वाहतुकीसाठी होणार खुला

SCROLL FOR NEXT