Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

अमित शाहांचा फोन आला होता का? मायकल लोबोंचं थेट उत्तर

काँग्रेसचे आमदार काहीही झालं तरी फुटणार नाहीत, लोबोंना विश्वास

आदित्य जोशी

पणजी : भाजपमधून बंड करुन काँग्रेसवासी झालेले कळंगुटचे आमदार मायकल लोबो हे अमित शाहांसोबतच्या फोनमुळे चांगलेच चर्चेत होते. गेले काही दिवस ते माध्यमांपासून दूर होते. मात्र अखेर आज काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमित शाहांसोबतची ती चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचा दावा मायकल लोबोंनी केला आहे. गोव्यात सोशल मीडियावरुन अफवांना ऊत आला असून आमदार होण्याआधीच अफवा सुरु असल्याचा आरोप मायकल लोबोंनी केला आहे. काँग्रेसचे आमदार काहीही झालं तरी फुटणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. (Michael Lobo News Updates)

येत्या 10 मार्चला 3 वाजेपर्यंत निकाल हाती येणार अशी अपेक्षा आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता काँग्रेसचे (Congress) आमदार आपला नेता निवडून सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचंही लोबोंनी स्पष्ट केलं आहे. विरोधीपक्षात बसणाऱ्यांनी म्हणजेच भाजपने आमची चिंता करु नये. आमच्या संपर्कात सर्वच पक्षांचे नेते आहेत, मात्र त्यांना भाजपचं (BJP) सरकार येऊ द्यायचं नाही. त्यामुळे भाजपचं धाबं दणाणलं असून आता सर्व पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपमध्ये चिंतेचं वातावरण आहे असा टोलाही लोबोंनी लगावला आहे.

भाजपला लाथ मारुन मगोपने आघाडीतून बाहेर पाडलं. मला ढवळीकर बंधूंचा आदर आहे. भाजपकडून ढवळीकर बंधूंना धमक्या दिल्या जात आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत ढवळीकर बंधू पुन्हा भाजपसोबत जाणार नाहीत. मगोपचे आमदार चोरुन नेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप मायकल लोबोंनी केला आहे.

गोव्याला पुन्हा एकदा मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे गोवेकरांनी आनंदी राहावं. त्यांना हवं तेच आता गोव्यात होणार, असा विश्वासही लोबोंनी व्यक्त केला. अमित शाहाचा कॉल आला हे छापून आणणाऱ्यांनाच विचारा. मायकल लोबो फुटणाऱ्यांपैकी नाही. फोडाफोडीचं राजकारण करणारे आता पक्षात नाहीत, असा बोचरा वारही त्यांनी केला आहे.

दरम्यान लोबोंनी (Michael Lobo) शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन गोव्यातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. लिंक रोडसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. उड्डाणपुलं बांधून जमिनी वाचवता आल्या असत्या मात्र सरकारने लोकांच्या शेतजमिनींवर रस्ते बांधण्याचा चंग बांधल्याचा आरोप लोबोंनी केला आहे. तसंच यावेळी ईडी आणा किंवा आयकर आणा आमदार घाबरणार नाहीत, ते काँग्रेससोबत राहणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT