Mhaje Ghar Dainik Gomantak
गोवा

Mhaje Ghar: 'म्हजे घर'बाबतीत नवी अपडेट! सुनावणी 1 एप्रिलपर्यंत लांबणीवर; याचिकाकर्त्याच्या पात्रतेवर सरकारचा आक्षेप

Mhaje Ghar Goa: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी घर’ योजनेशी संबंधित जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी घर’ योजनेशी संबंधित जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी झाली. मात्र, याचिकाकर्त्याच्या पात्रतेवर महाधिवक्त्यांनी प्राथमिक आक्षेप घेतल्यामुळे न्यायालयाने ही सुनावणी १ एप्रिलपर्यंत तहकूब केली आहे.

न्यायालयाने शेट्ये यांना या आक्षेपावर लेखी उत्तर सादर करण्यासाठी वेळ दिला असून पुढील सुनावणीत ते दाखल करणार आहे. सरकारच्या वतीने बाजू मांडताना महाधिवक्त्यांनी युक्तिवाद केला की, याचिकाकर्ते काशिनाथ शेट्ये हे स्वतः एक सरकारी कर्मचारी आहेत.

नियमानुसार, कोणताही सरकारी कर्मचारी राज्य सरकारविरुद्ध जनहित याचिका दाखल करू शकत नाही, त्यामुळे ही याचिका फेटाळून लावण्यात यावी.

शेट्ये यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मी सरकारी कर्मचारी असल्याने याचिका दाखल करू शकत नाही, असा दावा सरकारचा आहे. मात्र, २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ''विजय शंकर पांडे'' प्रकरणात हा मुद्दा स्पष्ट केला आहे.

नियोजनशून्य शहरामुळे भविष्यात गोंधळ!

शेट्ये यांनी स्पष्ट केले की, त्यांचा विरोध पुनर्वसन योजनेला नसून ती राबवण्याच्या पद्धतीला आहे. त्यांच्या याचिकेत ''रोका'', ''लँड रेव्हेन्यू कोड'' आणि कोमुनिदाद कायद्यातील दुरुस्त्यांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. नियोजनशून्य शहरामुळे भविष्यात गोंधळ निर्माण होईल. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पुनर्वसनाचा निर्णय चांगला आहे, मात्र त्यात सुधारणा आवश्यक आहे. सर्व अतिक्रमणे हटवून त्यांना एकाच ठिकाणी पद्धतशीरपणे जागा दिली जावी, ही आमची मागणी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

Goa Kala Academy : कला अकादमीला आता तरी जाग येणार का?

SCROLL FOR NEXT