Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘माझे घर’ हा सरकारचा निवडणूक स्टंट, लोकांची फसवणूक करण्याचे षडयंत्र! अमित पाटकरांचे टीकास्त्र

Amit Patkar: ‘व्होटचोरी’वर जागृती करून निवडणूक आयोगाला निवेदन पाठविण्यासाठी सह्यांची मोहीम पक्षाने हाती घेतली आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, असेही अमित पाटकर यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी: सध्या गोव्यात गोमंतकीय आपल्याच घळात सुरक्षित नसून मुख्यमंत्री राज्यभर ‘माझे घर’ योजनेच्या प्रचारासाठी फिरत आहेत. ‘माझे घर’ हा एक निवडणूक स्टंट असून अनेक योजनांप्रमाणेच लोकांची फसवणूक करण्याचे एक षडयंत्र आहे.

देशभरात सुरू असलेल्या ‘व्होटचोरी’वर जागृती करून निवडणूक आयोगाला निवेदन पाठविण्यासाठी सह्यांची मोहीम पक्षाने हाती घेतली आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी साखळी येथे सांगितले.

साखळीत आयोजित सह्यांच्या मोहिमेत पाटकर यांच्यासह उत्तर गोवा अध्यक्ष विरेंद्र शिरोडकर, साखळी गटाध्यक्ष राजेश सावळ, महिला अध्यक्ष गौरी गावस, अल्पसंख्याक अध्यक्ष झरीन शेख, महिला नेत्या रेणूका देसाई, माजी नगरसेवक राजेंद्र आमेशकर व इतरांची उपस्थिती होती.उपस्थितांनी यावेळी साखळी बसस्थानक परिसर, बाजारात फिरून लोकांमध्ये जागृती केली व सह्या घेतल्या.

‘माझे घर’विरोधींना जवळ करू नका!

सर्वसामान्य गोवेकरांना दिलासा देण्यासाठी आखण्यात आलेल्या ‘माझे घर’ योजनेला विरोध करणाऱ्या लोकांना जवळ करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून राज्यातील सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन या योजनेची अंमलबजावणी होणार आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT