Mhadei Prawah  Dainik Gomantak
गोवा

Mhadei River: म्हादई ‘प्रवाह’कडून विर्डी धरणाची पाहणी

Mhadei Water Dispute: महाराष्ट्राकडून पालन; कर्नाटकचे पितळ उघडे पडणार

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्र - गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांमध्ये पाणी वाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय जलतंटा लवादाने नेमलेल्या ‘म्हादई प्रवाह प्राधिकरण समिती’ने आज विर्डी धरणाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी लवादाने नेमून दिलेल्या अटी -शर्थीच्या अधिन राहून धरणात पाणीसाठा झाला आहे की नाही याची पाहणी केली. महाराष्ट्र सरकारकडून काटेकोर पालन होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.

कर्नाटक सरकारचा कळसा - भांडुरा प्रकल्प आणि महाराष्ट्र सरकारचा विर्डी धरण प्रकल्प यावरून गोवा - कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यात वाद आहेत.

विर्डी धरणाच्या उंचीला गोव्याने आक्षेप घेतला असून धरणाची उंची वाढविल्यास त्याचा विपरीत परिणाम गोव्यातील साखळी व आजूबाजूच्या परिसराला बसेल आणि उन्हाळ्यात वाळवंटी नदीचे पात्र आटून तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल असे गोव्याचे म्हणणे आहे. सध्या त्यावरच केंद्रीय जलतंटा लवादाकडे दोन्ही राज्यांकडून वाद-विवाद सुरू आहेत.

 तिलारी प्रकल्पाला समितीची भेट

महाराष्ट्र व गोवा संयुक्त विद्यमाने उभारलेल्या तिलारी प्रकल्पाची म्हादई प्रवाह प्राधिकरण समितीचे अध्यक्ष पी. एम. स्कॉट यांनी पाहणी केली. त्यांनी प्रथमच तिलारी प्रकल्पाला भेट दिली. यावेळी तिलारीचे उपविभागीय अधिकारी बुचडे व उपविभागीय अभियंते मेहेत्रे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT