Mhadei Water Dispute 
गोवा

Mhadei Water Dispute: म्हादई! गोवा कर्नाटकविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार अवमान याचिका

Mhadei Water Dispute: कळसाचे पाणी मलप्रभेत वळविण्यासाठी कालवा खोदण्याचे काम कर्नाटक सरकारने सुरु केले आहे.

Pramod Yadav

Mhadei Water Dispute

कळसाचे पाणी मलप्रभेत वळविण्यासाठी कालवा खोदण्याचे काम कर्नाटक सरकारने सुरु केले आहे. याबाबत विरोधकांनी गोवा सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर आता गोवा सरकार सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे.

कर्नाटकविरोधात गोवा अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे.

कळसा-भांडुराचे पाणी मलप्रभेत वळविण्यासाठी कर्नाटक सरकार विविध पद्धतीने प्रयत्न करत असल्याचे वारंवार समोर आले आहे. अलिकडेच त्यांनी कळसाचे पाणी मलप्रभेत वळविण्यासाठी कालवा खोदण्याचे काम सुरु केले आहे.

केरी-सत्तारी येथील विवेकानंद पर्यावरण जागरूकता ब्रिगेडच्या स्वयंसेवकांनी नुकतीच कणकुंबीला भेट दिली असता कालव्याचे काम सुरु असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी देखील याबाबत व्हिडिओ शेअर करत याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच, सरकारवर टीका केली.

दरम्यान, आता या गंभीर प्रकाराची सरकारने देखील दखल घेतली आहे. गोवा सरकार कर्नाटकविरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे.

तसेच, प्रवाह समितीला पत्र लिहून काम सुरु असलेल्या ठिकाणाचे संयुक्त तपासणी करण्याची मागणी देखील करणार असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकातून लोकसभेत 28 खासदार जातात, त्यातील बहुतेक भाजपचे असावेत. यासाठी केंद्राकडून जाणूनबुजून म्हादईचा गळा घोटला जातो व सरकार त्याकडे निर्लज्जपणे पाहत आहे, असा आरोप विजय सरदेसाई यांनी केला.

कळसा-भांडुराचे पाणी मलप्रभेत वळविण्यास कर्नाटकचा डाव साध्य झाल्यास गोव्याला मोठी किंमत मोजावी लागेल, असे आमदार वेंझी व्हिएगस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT