IAS Transfer Dainik Gomantak
गोवा

IAS Transfer: गोव्यातील चार 'आयएएस' अधिकऱ्यांची बदली

ऐन पंचायत निवडणूकीच्या तोंडावर प्रशासकिय अधिकाऱ्यांची बदली

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील चार 'आयएएस' अधिकऱ्यांची (MHA issues transfer orders for IAS officers) बदली झाली आहे. आयएएस अधिकारी संजीत रॉड्रीगीस (2013) यांची अरूणाचल प्रदेश, संजीव गडकर (2013) यांची जम्मू काश्मीर, यतिंद्र मराळकर (2013) यांची लडाख येथे आणि प्रसन्न आचार्य (2016) यांची मिझोरम राज्यात बदली करण्यात आली आहे. यासह पद्दुचेरी मधील देखील चार आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.

केंद्रिय गृह मंत्रालयाने (Home Ministry) यासंबधीचे आदेश जारी केले असून, तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करण्याचे सूचित केले आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये गोव्यात कार्यरत असलेल्या पाच आयएएस अधिकारी (IAS) आणि एका आयपीएस (IPS) अधिकाऱ्याची बदली केली होती. त्यानंतर आता आणखी चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश केंद्रिय गृह मंत्रालयाने दिले आहेत.

दरम्यान, गोव्यात सध्या पंचायत निवडणूकीचे वातावरण आहे. प्रसासन निवडणूका सुरळित पार पडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशात प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यात येत्या 10 ऑगस्टला 186 पंचायतीसाठी मतदान होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT