Sudin Dhavalikar MGP Dainik Gomantak
गोवा

MGP: 'आम्ही युती धर्म पाळणार आहोत'! ढवळीकरांचे स्पष्टीकरण; उमेदवारांबद्दल म्हणााले की..' Watch Video

Sudin Dhavalikar: राज्यात युतीचे सरकार असून युती धर्म आम्ही पाळणार आहोत, असे सांगून वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दोन दिवसांत ‘मगो’चे उमेदवार जाहीर करू, असे सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: मगो पक्षातर्फे जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी रविवारी म्हार्दोळ येथील देवी महालसेला नारळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ केला. मगो आणि भाजप यांचे सध्या राज्यात युतीचे सरकार असून युती धर्म आम्ही पाळणार आहोत, असे सांगून वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दोन दिवसांत ‘मगो’चे उमेदवार जाहीर करू, असे सांगितले.

उमेदवारांची निवड ही मगो पक्ष केंद्रीप कार्यकारिणी तसेच इतर सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन जाहीर करण्यात येणार आहे. मगो पक्षाचे कार्यकर्ते तसेच मगो प्रेमी नागरिक आणि महत्वाचे म्हणजे मतदारांनी मगो उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे,असेही मंत्री ढवळीकर म्हणाले.

यावेळी मगो प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवी महालसेचे आशीर्वाद घेण्यासाठी मगो पक्षाचे नेते तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, युवा नेते मिथिल ढवळीकर, विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक तसेच गणपत नाईक, केंद्रीय कार्यकारिणी खजिनदार अनंत नाईक तसेच इतर पदाधिकारी, विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य आणि मगो कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवी महालसेला नारळ ठेवून सांगणे करण्यात आले. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी देवी महालसेचे फोंड्यातील विविध राजकीय पक्षांकडून आशीर्वाद घेतले जातात. ही परंपरा मगो पक्षाने जपली आहे.

षडयंत्राला बळी पडणार नाही!

भाजपच्या षडयंत्राला मी बळी पडणार नाही. वास्तविक कुर्टीत ‘मगो’चा झेडपी सदस्य आहे त्यामुळे ही जागा ‘मगो’ ला देणे ठीक होते. पण ‘मगो’ला नाकारून मगो कार्यकर्त्यांच्या खच्चीकरणाचा भाजपचा डाव आहे जो मी उधळून लावणार आहे, असे ‘रायझिंग फोंडा’चे डॉ. केतन भाटीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: 'हे राजकारण मान्य नाही!' कुर्टी-फोंडा जागेवरून केतन भाटीकर आक्रमक; भाजपला थेट इशारा

Goa Forward: 'पोलिस आले, त्‍यांनी व्यासपीठावर जाऊन माईक बंद केला'! गावडोंगरीत अधिकाऱ्यांनी हलगर्जी केल्‍याचा गोवा फॉरवर्डचा दावा

Sangolda Casino: कॅसिनो कर्मचाऱ्यांचा दारूच्या नशेत धिंगाणा! सोशल मीडियावर होताहेत आरोप; सांगोल्डा येथील Viral Video मुळे चर्चा

Goa Live News: पेडणे पोलिसांची अंमली पदार्थांवर मोठी कारवाई; नायजेरियन नागरिकाकडून 1.05 लाखांचे ड्रग्ज जप्त

अल्पवयीन रशियन मुलींकडून फुलांची विक्री, पर्यटकांसोबत फोटोसाठी आग्रह; हरमल किनाऱ्यावरील Video Viral

SCROLL FOR NEXT