Metrology Department Quepem Dainik Gomantak
गोवा

Quepem News: केपेत स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच, ब्ल्यु टुथ स्पीकर्स जप्त; वजन माप खात्याची कारवाई

वैधमापन शास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

Akshay Nirmale

Metrology Department Quepem: केपे येथील मोबाईल फोन विक्री करणाऱ्या दुकानावर वजन माप खात्याने कारवाई केली आहे.

फोन, स्मार्ट वॉच, ब्ल्यू टुथ स्पीकर असा एक लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वैधमापन शास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

वजन माप खात्याने केपे येथे निरीक्षण मोहिम राबवली होती. त्यातून संबंधित मोबाईल विक्रेत्याने वैधमान शास्त्र कायदा 2009 चे उल्लंघन केल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्याकडून 8 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. त्यात स्मार्ट फोन तसेच स्मार्ट वॉच असा मुद्देमाल आहे.

शिवाय ब्ल्यु टुथ स्पीकरही जप्त करण्यात आले आहेत. हा सर्व मुद्देमाल सुमारे 1 लाख रूपयांचा आहे.

वैधमापन शास्त्र अधिनियम, 2009 अंतर्गत वजन व मापे यांचे मुद्रांकन, पडताळणी व प्रमाणपत्र देण्याचे काम केले जाते. त्याचे निकष पाळले गेले नाहीत तर वजन माप खात्यातर्फे कारवाई केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

SCROLL FOR NEXT