Fatorda Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Fatorda Crime: सामूहिक लैंगिक अत्याचार झालेली ती युवती 'मनोरुग्ण', पाच परप्रांतीयांना अटक

Goa Crime News: मुलीचे फातोर्डा येथून अपहरण करून तिला कासावली येथील फ्लॅटवर आणण्यात आले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: फातोर्डा येथून एका मनोरुग्ण युवतीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी पाच परप्रांतीयांना अटक करण्यात आली आहे.

आदिल अलगर (१८), मोहम्मद अली मुल्ला (२२), शाहजाद शेख (१८), विरेश आग्वांदा (१८) व मोहम्मद शेख (१८) असे अटक करण्यात आलेल्या पाचजणांची नावे आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या मुलीचे फातोर्डा येथून अपहरण करून तिला कासावली येथील फ्लॅटवर आणण्यात आले होते. त्याठिकाणी तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी पाच परप्रांतीयांना अटक केली आहे. यासंदर्भात, पोलिस अधिक माहिती घेत असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फातोर्डा पोलिसांकडून गुरुवारी रात्रीच संशयितांना ताब्यात घेतले होते. शुक्रवारी सकाळी चार संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर काही कालावधीने पाचव्या संशयिताला देखील ताब्यात घेतले. चौकशीअंती पोलिसांनी गुन्हा नोंद करुन पाच जणांना अटक केली. संशयितांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT