Sawantwadi Dainik Gomantak
गोवा

जंगलात साखळदंडाने बांधलेल्या 'त्या' अमेरिकन महिलेबाबत पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड, पोलिसही चक्रावले

Sawantwadi Maharashtra: अमेरिकन महिला मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट; पारपत्राची मुदत संपल्याने नैराश्येतून केले कृत्य.

गोमन्तक डिजिटल टीम

बांदा: रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या ‘त्या’ अमेरिकन महिलेनेच बनाव रचल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. ती मनोरुग्ण असून, तिच्या पारपत्राची (पासपोर्ट) मुदत संपल्याने अमेरिकेत जाण्यासाठी अडचणी येत असल्याच्या नैराश्येतून हे कृत्य केल्याची माहिती तिने जबाबात दिली आहे. ललिता काई कुमार एस. असे तिचे नाव आहे.

दरम्यान, तमिळनाडू येथील तिरुवेलापूरम येथेही तिने काही वर्षांपूर्वी असाच बनाव केल्याची माहिती तमिळनाडू येथे तपासासाठी गेलेल्या पोलिस पथकाला मिळाली आहे. तिचे लग्नदेखील झाले नसल्याची माहितीही तपासात उघड झाली असून, तिने सांगितलेले सतीश हे पतीचे नावही आभासी आहे.

तिचे आधारकार्डही बनावट असल्याचे कळाल्याने त्याच्या पडताळणीसाठी राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) मदत घेतली जात असल्याची माहिती पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

सद्यस्थितीत त्या महिलेवर रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा तिचा जबाब नोंदविला आहे. त्यावेळी तिने सर्व खरी हकीकत पोलिसांना सांगितली. त्यामुळे ‘साखळदंडाने बांधून ठेवलेल्या’ प्रकरणाचे गूढ आता उघड झाले आहे.

आपल्या पारपत्राची मुदत संपली होती. आपल्याला अमेरिकन दुतावासाच्या माध्यमातून मायदेशी जाण्यासाठी प्रयत्न सुरू होते; मात्र या प्रक्रियेला यश मिळत नव्हते. मला माझ्या नातेवाइकांकडून पैसे येणे बंद झाले होते. त्यामुळे नैराश्येतून स्वतः आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. यातूनच हा प्रकार केल्याचे तिने जबाबात म्हटले आहे.

एकूण घटनाक्रम सांगताना, ‘आपण कोकण रेल्वेतून मडुरा येथील स्थानकात उतरले. तेथून स्वतःच जंगलात वाट मिळेल तिथे गेले. त्यानंतर आपण स्वतःलाच साखळीने बांधून घेत जंगलात तीन रात्री काढल्या,’ असे तिने सांगितले. तिच्या या जबाबमुळे पोलिसही चक्रावले असून, तिने मानसिक नैराश्येतून हे कृत्य केल्याचे यामुळे उघड झाले आहे.

आधीही केलेला बनाव

तमिळनाडूतील येथील तिरुवेलापुराम येथे महिलेचे वास्तव्य होते. हे ठिकाणी धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी बहुसंख्येने विदेशी पर्यटक येतात. ही महिलाही याठिकाणी योगाभ्यास करण्यासाठी आली होती.

ती मनोरुग्ण असल्याने याठिकाणीदेखील तिने असाच प्रकार केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पोलिस याची सविस्तर माहिती घेत आहेत. गोवा, मुंबई व दिल्ली येथे तिच्या मानसिक आजारावर उपचार झाले आहेत.

महिलेने जबाबत दिलेल्या माहितीची खातरजमा पोलिस करत आहेत. तिच्यावर अमेरिकेतही मानसिक उपचार झाले आहेत. त्यामुळे ती माहितीदेखील पोलिस घेत आहेत.

मायदेशी पाठवणार

अमेरिकन दुतावासाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली असून, भारत सरकारकडून सविस्तर माहिती घेतली आहे. अमेरिकेत या महिलेसाठी सोशल मीडियावर कॅम्पेनिंग सुरू असल्याने तिला पुन्हा मायदेशी पाठविण्यासाठी दुतावास प्रयत्नशील आहे.

यासाठी तिच्यावर सुरू असलेल्या वैद्यकीय उपचारांची माहिती अमेरिकन दुतावास घेत असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला लवकरच मायदेशी पाठविण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT