Raksha Bandhan 2023 :  Dainik Gomantak
गोवा

Raksha Bandhan 2023 : इंदूरमध्ये कार्यकर्त्यांसोबतची भाऊबीज संस्मरणीय! मंत्री विश्‍वजित राणे

Raksha Bandhan 2023 : जोशी कुटुंबीयांचा अविभाज्य भाग बनल्याचे वाटले

गोमन्तक डिजिटल टीम

Raksha Bandhan 2023 : पणजी, ज्येष्ठ कार्यकर्ते राजीव जोशी यांच्या घरी आज ‘भाईदूज’ अर्थात ‘भाऊबीज’ साजरी केली. राजीव जोशी यांची मुलगी रिद्धी जोशी हिने हा विधी पार पाडला, त्यामुळे मला त्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग असल्याचे वाटले.

त्याच्या कुटुंबाचा चांगुलपणा, सर्वसमावेशकता यामुळे आजची भाऊबीज खास आणि संस्मरणीय बनली,असे उद्‍गार गोव्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काढले.

राज्यात भाऊ-बहिणींचे अतूट नाते वृद्धिंगत करणारा भाऊबीज सण साजरा होत असताना आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे मध्य प्रदेशच्या निवडणूक प्रचारात व्यग्र आहेत. भाऊबीज सणाचे औचित्य साधून मंत्री राणे यांनी आज मध्य प्रदेशमधील इंदूर येथील जोशी कुटुंबीयांसमवेत भाऊबीज साजरी केली.

मंत्री राणे पुढे म्हणाले,की मध्यप्रदेशातील आगामी निवडणुकीसाठीचा प्रचार संपत आला असताना, मी इंदूरमधील सर्व उमेदवारांना, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. मध्य प्रदेश हे पूर्वी अनेक विचारवंतांचे जन्मस्थान राहिले आहे.

जोशी यांचे अनुभव, अंतर्दृष्टी प्रचारादरम्यान अनेक प्रसंगी निर्णायक ठरली. जोशी यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटणे, संवाद साधणे अगदीच कौटुंबिक वाटले,असेही राणे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची भाऊबीज

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज आपल्या बहिणीच्या घरी जाऊन भाऊबीज हा सण साजरा केला. त्यांच्या बहिणीने दीर्घायुष्य, सुख- समाधान, ऐश्वर्य लाभावे, अशी इच्छा व्यक्त करून औक्षण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT