Panaji News Gomantak Digital Team
गोवा

Panajim News : भूवापर आराखड्यासह नोंदणी मसुदा रद्द करा

ताळगाव नागरिकांनी एनजीपीडीएला दाखवल्या त्रुटी

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Land Use Planning : उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाने (एनजीपीडीए) जाहीर केलेल्या ताळगाव भूवापर आराखडा व भूवापर नोंदणी मसुद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. हा आराखडा व नोंदणी कायद्याचे उल्लंघन करून केला आहे. त्यामुळे हरकती व सूचना ताळगाववासीयांकडून मागवण्याऐवजी तो रद्द करून स्थानिक नागरिक, ताळगाव पंचायत तसेच संबंधित सरकारी खात्यांना विश्‍वासात घेऊन तो नव्याने तयार करण्याची मागणी ताळगाव जागृत नागरिकांनी केली आहे.

प्राधिकरणाने ताळगाव भूवापर आराखडा व भूवापर नोंदणी याबाबत लोकांकडून हरकती व सूचना मागितल्या आहेत, त्याला आमचा विरोध आहे. हा आराखडा व नोंदणी सध्या अस्तित्वात असलेल्या माहितीच्या आधारे तयार करण्याची कायद्यात तरतूद असताना एका दशकापूर्वीच्या माहितीवर तो तयार केला आहे. त्यामुळे तो रद्द करावा. जी माहिती या आराखड्यात नाही त्याचा समावेश करून तो तयार करावा व त्यानंतरच त्यावर हरकती व सूचना मागवण्यासाठी लोकांसाठी खुला ठेवला जावा अशी मागणी, सिसिल रॉड्रिग्ज यांनी केली.

आक्षेप काय?

  • आराखड्यासंदर्भात प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून मागितलेले स्पष्टीकरण संशयास्पद असून यात गैरव्यवहाराची शंका आहे. आराखड्यात ताळगावातील डोंगर, काही रस्त्यांचा उल्लेख नाही.

  • सर्वे खात्याने प्राधिकरणाला ताळगावातील सध्याची माहिती दिली नसल्याने तो २०१० सालच्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेला आहे.

  • हा आराखडा व नोंदणी प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी जाऊन जमा केलेल्या माहितीच्या आधारे तसेच ड्रोनच्या वापर करून केली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले तरी त्यात खोटारडेपणा आहे.

  • त्यांनी केलेल्या या सर्वेबाबात स्पष्टीकरण देऊ शकत नाहीय त्यामुळे हा आराखडा सत्य माहिती दडपून तयार केल्याचा आरोप ॲड. भूपेंद्र यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT