Goa Mega Project Canva
गोवा

Candolim News: मेगा प्रकल्पांविरोधात गोव्यात वातावरण तापले; 'कांदोळी'त बड्या कंपनीने केली जमीन खरेदी, स्थानिकांमध्ये नाराजी

Candolim Mega Project: मेगा प्रकल्‍पांविरोधात राज्‍यभर वातावरण तापले असतानाच कांदोळीत आता आणखी एक प्रकल्‍प येण्‍याची चिन्‍हे दिसू लागली आहेत. ‘एमआरओ टेक रियल्टी’ या कंपनीने प्रकल्पाची घोषणा केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Candolim Mega Project News

पणजी: मेगा प्रकल्‍पांविरोधात राज्‍यभर वातावरण तापले असतानाच कांदोळीत आता आणखी एक प्रकल्‍प येण्‍याची चिन्‍हे दिसू लागली आहेत. ‘एमआरओ टेक रियल्टी’ या कंपनीने प्रकल्पाची घोषणा केली आहे.

मोठे गृहनिर्माण प्रकल्प नको, अशी भूमिका गावागावांत ग्रामस्थ घेत आहेत. कंपन्या, बिल्‍डरांनी भले जमीन विकतही घेतली असेल, पण त्यांनी प्रकल्प उभारू नयेत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र आता ‘एमआरओ टेक रियल्टी’ कंपनीने बांधकाम क्षेत्रात विस्तार करण्यासाठी कांदोळी येथे जमीन खरेदी केली आहे. त्या ठिकाणी मोठा गृहनिर्माण प्रकल्प साकारला जाऊ शकतो. ही जमीन सुप्रसिद्ध पर्यटन स्थळावर मध्यवर्ती ठिकाणी आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे.

माजी सरपंचांचे ‘भूतानी’विरोधात बेमुदत उपोषण

सांकवाळ येथील ‘भूतानी’ प्रकल्‍पाविरोधात माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांनी पंचायतीबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले. जोपर्यंत पंचायत या प्रकल्‍पाचा परवाना रद्द करत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा त्‍यांनी दिला आहे. लोकांचाही या प्रकल्‍पाला तीव्र विरोध आहे. सांकवळ पंचायतीने ११ मार्च २०२४ रोजी या प्रकल्पासाठी परवाना जारी केला होता. त्यानंतर कंपनीने बांधकाम सुरू केले. मुरगाव ‘पीडीए’ने २ फेब्रुवारी रोजी तर ‘रेरा’ने २२ मार्च २०२४ रोजी परवाना जारी केला. या सर्व परवानग्या मिळाल्यानंतर कंपनीने काम सुरू केले आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र, कंपनीने नगरनियोजन कायद्यातील कलम १७ ‘अ’ नुसार डोंगरकापणीसाठीचा परवाना घेणे आवश्यक होते. मात्र तो घेण्‍यात आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT