South Goa District Hospital Dainik Gomantak
गोवा

मडगावातील जिल्हा रुग्णालयात औषधेच मिळत नसल्याचा रुग्णांचा आरोप

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांची औषधांसाठी धावाधाव

दैनिक गोमन्तक

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाजवळ औषधांची दुकानं नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचं चित्र आहे. मडगावसारख्या मोठ्या शहरात अशाप्रकारची समस्या उद्भवत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मडगावमधील जिल्हा रुग्णालयाशेजारी औषध दुकानांची कमतरता असून रुग्णालयाच्या फार्मसीमध्येही औषधांची उपलब्धता नसल्याने रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. (South Goa District Hospital News Updates)

गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात औषधांची कमतरता असल्याचा रुग्णांचा आणि नातेवाईकांचा आरोप आहे. त्यातच रुग्णालयात वेळेवर औषध न मिळाल्याने रुग्णांचाही जीव धोक्यात येत आहे. जवळपास कोणतीही खासगी फार्मसी (Medical) नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मडगाव शहरात येऊन औषधांची शोधाशोध करावी लागत आहे. मडगावमधील वाहतूक कोंडीवर मात करत रुग्णांचे नातेवाईक तारेवरची कसरत करत असल्याचं चित्र आहे.

काही महिन्यांपूर्वी होस्पिसिओ नवीन जिल्हा रुग्णालयात (Hospital) स्थानांतरित करण्यात आले होते. रुग्णालयात कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. पत्रकारांनाही परवानगीशिवाय रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांशी बोलता किंवा भेटता येत नाही. मात्र आरोग्य सेवेच्या बाबतीत सावळागोंधळ असल्याचा आरोप नातेवाईकांकडून होऊ लागला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सुरक्षेवर इतका खर्च करुनही रुग्णालयात रुग्णांना (Patient) औषधच मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान आरोग्य संचालक डॉ. इरा आल्मेदा यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT