काणकोण : पाटणे किनाऱ्यालगत वैद्यकीय कचरा टाकण्यात येत असल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पाटणे-केपे येथे किनारऱ्यालगत हजारोंच्या संख्येने वापरलेल्या इंजेक्शन सिंरिंज व अन्य वैद्यकीय कचरा टाकला जात आहे. त्यामुळे पाटणे भागात दुर्गंधी पसरली आहे.
पाटणे किनाऱ्यालगत टाकलेल्या इंजेक्शन सिरिंजची काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राचे सॅनिटरी इन्स्पेक्टर प्रणय नाईक यांनी पाहणी केली. तसेच या सिरिंजची वैज्ञानिकदृष्ट्या विल्हेवाट लावण्यासाठी त्या एकत्र केल्या.
मडगाव येथील एका खाजगी संस्थेतर्फे महिना ३ ते ४ हजार रुपये शुल्क आकारून वैद्यकीय कचऱ्याचे संकलन केले जाते. चावडी येथील काही खाजगी डॉक्टर या संस्थेची सेवा घेत आहेत. इंजेक्शन सिरिंजची सुई इंजेक्शन केल्यानंतर नष्ट केली जाते. मात्र पाटणे येथे टाकण्यात आलेल्या इंजेक्शन सिरिंज सुईसह असल्याने त्या जास्त धोकादायक बनल्या असल्याचे नाईक यांनी सांगितले.
पाटणे समुद्र किनाऱ्यालगत वैद्यकीय कचरा टाकण्यात येत असल्याने नगरसेवक शुभम कोमरपंत यांच्यासह स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. काणकोणात निवासी डॉक्टरांची संख्या कमी आहे. मडगावहून सकाळी काणकोणात वैद्यकीय सेवा देऊन ते सायंकाळी परत मडगावला जातात. फक्त एकच डॉक्टर चावडी येथे कायमस्वरूपी सेवा देत असल्याची माहिती मिळाली आहे.
वैद्यकीय कचरा टाकणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय क्लिनिकचे नाव माहीत आहे; मात्र ते उघड करण्यास आम्हाला स्वारस्य नाही. कचऱ्यामुळे पाटणे भागात दुर्गंधी पसरली आहे. या भागात पावसात पाणी साचत असल्याने सिरिंज पर्यटकांच्या पायाला टोचण्याची शक्यता येथील युवक सुनय कोमरपंत यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.