Rishabh Talwadekar Goa Neet Dainik Gomantak
गोवा

Rishabh Talwadekar: आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे यश! ‘नीट’ मध्ये अव्वल आलेल्या ऋषभचे प्रतिपादन

NEET 2025 Goa state topper Rishabh Talwadekar: वैद्यकीय क्षेत्राचा ओढा वाढला, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे पाऊल टाकल्याचे नीट परीक्षेत गोव्यात प्रथम स्थान पटकावलेल्या तळवडकरने सांगितले.

Sameer Panditrao

पणजी: वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले आई-वडील हे आपले आदर्श राहिले आहेत. अकरावी -बारावीमध्ये जीवशास्त्र आवड निर्माण होत गेली आणि पुढे नैसर्गिकरित्या वैद्यकीय क्षेत्राचा ओढा वाढला, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे पाऊल टाकल्याचे नीट (राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा) या देशपातळीवरील परीक्षेत देशात ५७० वा आलेला व गोव्यात प्रथम स्थान पटकावलेल्या ऋषभ तळवडकरने ‘गोमन्तक’ ला सांगितले.

‘नीट’चा निकाल आल्यानंतर आपल्याला खूप आनंद झाला. केवळ आपल्यालाच नाही तर कुटुंबातील प्रत्येकाला आनंद झाला. दोन वर्षे कसून केलेला सराव कामी आला, असेही त्याने सांगितले. नववी व दहावीत विज्ञान हा आवडीचा विषय असल्याने अकरावीत विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.

आता कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचे हे राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) विद्यार्थ्यांना सूची पाठविते, त्यानंतर विद्यार्थी हवे ते वैद्यकीय महाविद्यालय निवडतात, त्यानुसार ते निवडले जाईल.

दररोज तीन-चार तास अभ्यास केला, मोबाईलशी जास्त सलगी ठेवली नाही. चित्रपट पाहण्यास आवडते. त्यामुळे कंटाळा आला की चित्रपट पाहण्यास जास्त पंसती दिली. शिवाय अभ्यासावेळी कोणीही आपणास विचलीत करीत नसे.

आई-वडील, बहीण, काका, मामा यांनी सतत पाठिंबा दिला. त्यामुळे मला त्याचा चांगला लाभ झाला, असे ऋषभ तळवडकर याने सांगितले.

डॉ. नीलेश तळवडकर

आपण ऋषभवर या परीक्षेसाठी अजिबात दबाव आणला नाही. त्याला अभ्यासासाठी पूर्ण मोकळीक दिली होती. जर या परीक्षेत कमी गुण मिळाले तर आपण पुढे पाहू, असे सांगून त्याच्यावर दबाव येईल, असे काहीच केले नाही. तीन तासाची परीक्षा असते अनेक विद्यार्थी त्याला सामोरे जात असतात. त्यामध्ये कमी-जास्त गुण मिळतात, त्यामुळे पालकांनी मुलांवर दबाव आणू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

Goa: वेटरकडून हॉटेलच्या मालकीणीवर बलात्कार, तोंडावर उशी ठेऊन दिली जीवे मारण्याची धमकी; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Goa Schools: राज्यातील शाळांमध्ये आता 'वॉटर ब्रेक'! विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळणार 2 मिनिटांचा वेळ; शिक्षण खात्याचा निर्णय

ED Goa: रोहन हरमलकरांचा पाय खोलात; जमीन हडप प्रकरणी ईडीने 212 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता केली जप्त

Goa Assembly: नोकऱ्या नसल्याने तरुणाई व्यसनांच्या विळख्यात... युरी आलेमाव यांचा गंभीर आरोप; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT