Goa chicken and mutton prices Dainik Gomantak
गोवा

Goa Meat Price Hike: नाताळ, सनबर्न, थर्टी फर्स्ट! गोव्यात उत्सवांच्या तोंडावर चिकन, मटण महागले

Goa chicken and mutton prices: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गोमांस विक्रेत्यांनी संप जाहीर केल्याने मटण, चिकनची मागणी वाढलीय.

Pramod Yadav

Goa chicken and mutton prices

पणजी: नाताळ, सनबर्न, नववर्षाचे स्वागत आणि राज्यातील विविध जत्रांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. पण, याच उत्सवांच्या तोंडावर राज्यात लाल भाजी अर्थात मटण, चिकनचे दर देखील वाढले आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या गोमांस विक्रेत्यांच्या संपामुळे देखील मटण, चिकनची मागणी वाढलीय.

डिसेंबर गोव्यात ऐन पर्यटनाचा हंगाम असतो. या काळात लाखो देशी - विदेशी पर्यटक राज्यात दाखल होतात. या महिना ते दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणावर मांसाची मागणी असते. त्यामुळे मटण, चिकनसह गोमांस आणि पोर्क मांसाचे देखील दर वधारतात. अशात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गोमांस विक्रेत्यांनी संप जाहीर केल्याने मटण, चिकनची मागणी वाढलीय. मागणी वाढल्याने दरात देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

असे आहेत मटण, चिकनचे दर

१) राज्यात मटण ८०० ते ८५० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे.

२) चिकन १५० ते २०० रुपये किलो

३) गोमांस ४८० ते ५०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असून त्याच्या दरात ५० ते ५० रुपयांची वाढ झालीय.

४) तसेच, पोर्क ४५० ते ५०० किलो दराने विकले जात जात आहे.

मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने मटणाचे दर वाधारले असल्याचे मांस विक्रेते सांगतात. तसेच, उत्सव काळात अनेकांना मटणचे हवे असते त्यामुळे देखील दर वाढतात, असे विक्रेत्यांनी सांगितले. नाताळ मध्ये चिकनची मागणी देखील वाढते त्यामुळे दरात वृद्धी होते, असे मत त्यांनी नोंदवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS Head To Head Record: टी-20 चा खरा किंग कोण? भारत-ऑस्ट्रेलिया महासंग्राम बुधवारपासून! काय सांगतो हेड-टू-हेड रेकॉर्ड?

Goa Ration Shop: गोव्यातील रेशन दुकानदारांसाठी खूशखबर! 1 कोटींचे थकीत कमिशन मिळणार; केंद्राकडून निधी मंजूर

41,663 रुपये दारुवर उडवले, बाकी गोवा ट्रीपचा खर्च फक्त 32 हजार; तुफान व्हायरल होतोय हा व्हिडिओ Watch

20 दिवसांत टक्कल होणार गायब! वैज्ञानिकांनी बनवले केस उगवणारे चमत्कारी औषध; जाणून घ्या कसे करते काम

India vs South Africa: 5 सामन्यांत 2 शतके, 1 द्विशतक...! श्रेयस अय्यरची जागा घेणार विराटचा पठ्ठ्या? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पाडणार छाप

SCROLL FOR NEXT