Quepem Municipality Dainik Gomantak
गोवा

Quepem Municipality: बाजार प्रकल्पातील दुकानांसंबंधी नगराध्यक्षांनी दिलीय 'ही' महत्वाची माहिती

सुचिता शिरवईकर : उद्‌घाटन होऊन दीड वर्ष उलटले तरी प्रकल्प बंदच

गोमन्तक डिजिटल टीम

Quepem Municipality केपे पालिका बाजार प्रकल्पाचे उद्‌घाटन होऊन वर्ष उलटले आहे. आता येत्या दोन महिन्यांत या प्रकल्पातील दुकानांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर यांनी सांगितले.

याविषयावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (ता.27) पालिका मंडळाची खास बैठक बोलावण्यात आली होती.

या प्रकल्पाचे उद्‌घाटन होऊन दीह वर्ष उलटले तरी अद्याप प्रकल्प सुरू का होत नाही, अशी लोकांमध्ये चर्चा सुरू होती. या प्रकल्पाचे सर्व काम पूर्ण झाले असून आता ज्या दुकानदारांचे जुन्या इमारतीतून स्थलांतर करण्यात आले होते त्यांच्याविषयीही यावेळी चर्चा करण्यात आल्याचे शिरवईकर यांनी सांगितले.

हा प्रकल्प तयार असूनही तो सुरू न झाल्याने पालिकेला महसुलापासून वंचित राहावे लागत आहे. लवकरात लवकर प्रकल्प सुरू करण्याचा आमचा विचार असून येत्या दोन महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून दुकानांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जुन्या जागीच नवीन प्रकल्प

ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे, त्या ठिकाणी पूर्वी पालिकेची जुनी इमारत होती तसेच मासळी मार्केट होते.

ही इमारत जुनी झाल्याने ती व्यापाऱ्यांसाठी धोकादायक बनल्याने त्या ठिकाणी व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे दुसऱ्या जागी स्थलांतर करून त्याच जागेवर नवीन बाजार प्रकल्प उभारण्यात आला आहे.

2021 साली विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते धडाक्यात उद्‌घाटन करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LeT terrorist shot dead: हाफिज सईदचा खास माणूस, लष्कर ए तैयबाचा दहशतवादी शेख मोईज मुजाहिदची गोळ्या घालून हत्या; Photo, Video समोर

Australia vs India, 2nd T20: टीम इंडियाचा फ्लॉप शो! मेलबर्नमध्ये 17 वर्षांनंतर पराभव, ऑस्ट्रेलियानं 4 गडी राखत मिळवला विजय

Smriti Mandhana Marriage: शुभ मंगल सावधान! स्मृती मानधना-पलाश मुच्छल यांच्या लग्नाची तारीख समोर, 'या' दिवशी पार पडणार विवाहसोहळा

गोवा बचाव! विरोधी पक्षातील नेते, सामाजिक कार्यकर्ते लोहिया मैदानावर एकवटणार; शनिवारी मडगावात कोळसा विरोधी आंदोलन

Shivneri Fort: इतिहासाचे सोनेरी पान उलगडणारी 'शिवजन्मभूमी', नाणेघाटाचे रक्षण करणारा अभेद्य 'शिवनेरी'

SCROLL FOR NEXT