Goa Mines  Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: आधी गावचे प्रश्न सोडवा मग खाण सुरू करा! मये-वायंगिणीतील नागरिकांची मागणी

Mayem Vainguinim Mining Disputes: सशिरगाव-मये ब्लॉकअंतर्गत असलेल्या साळगावकर खाणीसमोरही विघ्न निर्माण होण्याची शक्यता आहे. गावचे प्रमुख प्रश्न सोडवा, मगच खाण व्यवसाय सुरू करा, अशी मागणी मये-वायंगिणीच्या सरपंचांसह पंचसदस्य आणि शेतकऱ्यांनी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mayem Vainguinim Mining Disputes

डिचोली: शिरगाव-मये ब्लॉकअंतर्गत असलेल्या साळगावकर खाणीसमोरही विघ्न निर्माण होण्याची शक्यता आहे. गावचे प्रमुख प्रश्न सोडवा, मगच खाण व्यवसाय सुरू करा, अशी मागणी मये-वायंगिणीच्या सरपंचांसह पंचसदस्य आणि शेतकऱ्यांनी केली आहे.

तसेच कंत्राट पद्धत रद्द करा, अशीही मागणी करण्यात आली आहे. शिरगाव-मये ब्लॉकअंतर्गत येणारी पूर्वाश्रमीची चौगुले कंपनीची खाण आता साळगावकर शिपिंग कंपनीने लिलावात घेतली आहे.

कंत्राटी पद्धत नकोच

खाणबंदीमुळे पैरा-मये भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. खाण व्यवसायाला विरोध नाही. मात्र, प्रमुख प्रश्न सुटलेच पाहिजेत. घरी बसण्याची वेळ आलेल्या पूर्वाश्रमीच्या चौगुले कंपनीच्या कामगारांना पुन्हा कामावर रुजू करा. रोजगारात स्थानिकांना प्राधान्य द्या. शेतकरी आणि खाण अवलंबितांचे प्रश्न सोडवा. कंत्राटी पद्धत रद्द करा, अशी मागणी माजी सरपंच विजय पोळे यांनी केली. गावचे प्रश्न सोडविले नाहीत तर खाणीला विरोध करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शेती व्यवसाय संकटात

खाण व्यवसायामुळे शेती व्यवसाय पूर्णत: संकटात आला आहे. गाळ साचल्याने शेतीत यंत्राचा वापर होत नाही. गाळ उपसला नाही तर शेती नष्ट होईल. शेतकऱ्यांची प्रलंबित नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे, अशी व्यथा शेतकरी तथा माजी सरपंच सखाराम पेडणेकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तिसऱ्या अपत्याला 30 हजार तर चौथ्याला 40 हजार, आंध्र प्रदेश सरकारची अनोखी स्कीम; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा VIDEO

Rahu Gochar: नक्षत्र बदलून राहू करणार 3 राशींना मालामाल; मनासारखी नवीन नोकरी आणि मोठ्या पॅकेजची मिळणार ऑफर

Team India: क्रीडा जगतात मोठी खळबळ! टीम इंडियाच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप, थेट हकालपट्टीची कारवाई

Goa Dairy Subsidy: दूध उत्पादक आक्रमक! मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू; उत्तर गोवा शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा

Middle East War: एलपीजी, पेट्रोल अन् डिझेल आणखी महाग होणार? ट्रम्प-नेतान्याहूकडून मोठ्या हल्ल्याची तयारी; 'टार्गेट लिस्ट' बनवली

SCROLL FOR NEXT