Mayem Sport Ground Dainik Gomantak
गोवा

Mayem Sport Ground : मयेत क्रीडा मैदानाचा कायापालट; आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते कामास प्रारंभ

Mayem Sport Ground : ५० लाख खर्चून सुधारणा ; गावातील खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, क्रीडा क्षेत्रात पुढे येण्याची संधी मिळावी, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Mayem Sport Ground :

डिचोली, स्थानिक खेळाडूंसाठी वरदान ठरलेल्या केळबायवाडा-मये येथील क्रीडा मैदानाला आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत. क्रीडा आणि युवा व्यवहार खाते तसेच क्रीडा प्राधिकरणातर्फे सुमारे ५० लाख रुपये खर्चून या मैदानाची सुधारणा करण्यात येणार आहे.

शुक्रवारी (ता.१) स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, क्रीडा खात्याचे साहाय्यक अभियंता तिळवे, भाजप मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर, मयेचे सरपंच विद्यानंद कारबोटकर, उपसरपंच सुफला चोपडेकर, पंचसदस्य सीमा आरोंदेकर,

कृष्णा चोडणकर, वासुदेव गावकर, कनिवी कवठणकर, माजी सरपंच विजय पोळे, चोडणचे सरपंच रवींद्र किनळकर आदी उपस्थित होते. शंकर चोडणकर यांनीही यावेळी विचार मांडले. क्रीडा मैदानाचा विकास होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

चामेरे मैदानाचाही होणार विकास

गावातील खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, क्रीडा क्षेत्रात पुढे येण्याची संधी मिळावी, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

त्याच दृष्टीकोनातून मयेत क्रीडा मैदानाचा विकास करण्यात येणार आहे, असे प्रेमेंद्र शेट म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि क्रीडामंत्री गावडे यांना धन्यवाद दिले. मये मतदारसंघातील चामेरे क्रीडा मैदानाचाही विकास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नव्या सोयी-सुविधा होणार उपलब्ध

साडेआठ वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार स्व. अनंत शेट यांच्या पुढाकारातून या मैदानाची बांधणी करण्यात आली होती.

जून २०१५ मध्ये या मैदानाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, मध्यंतरी देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने या मैदानाच्या संरक्षक भिंतींची मोडतोड झाली आहे. आता या मैदानाला पुन्हा नवा साज देण्यात येणार आहे. या मैदानावर खेळाडूंना सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT