डिचोली : मये मतदारसंघावर काँग्रेससह गोवा फॉरवर्डने दावा केला असतानाच, हा मतदारसंघ काँग्रेसलाच द्यावा, अशी जोरदार मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. काल (शुक्रवारी) सायंकाळी डिचोलीत झालेल्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करीत, मयेची जागा काँग्रेसलाच द्यावी, अशी मागणी केली. येत्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डमध्ये युती झाली आहे. त्यामुळे मयेची जागा कोणाच्या वाट्याला येते.
त्याबद्दल मतदारसंघात उत्सुकता शिगेला पोचली आहे. मये मतदारसंघात काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी करताना काँग्रेसचे संभाव्य उमेदवार ॲड. प्रभुगावकर यांनी मतदारसंघात बैठका घेतानाच जनसंपर्कावर भर दिलेला आहे. तर दुसऱ्या बाजूने गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) संतोषकुमार सावंत यांनीही सध्या मये मतदारसंघात जोरात प्रचारकार्य सुरु केले आहे. यामुळे दोन्ही पक्षांचे गोंधळात असून, मयेतील मतदारही संभ्रमात आहेत.
यावेळी राजेश गावकर, निलेश कारबोटकर, विनोद धुरी आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली. मये मतदारसंघ काँग्रेसलाच सोडावा, अशी मागणी यावेळी या कार्यकर्त्यांनी केली. पळगावचे माजी सरपंच बाबाजी परब गावकर, अश्वेक घाटवळ, बबन सुर्लीकर, सावळो गावकर, शफिक पिरझादे,राजन मांद्रेकर, सतीश उसपकर, राजेंद्र मोरजकर, रक्षा च्यारी, जयंत गावकर, रामा गोवेकर, देवू गावकर, मनोहर साळगावकर, पुंडलिक गावकर, शिवा गावकर, निलेश सावंत, गुणो कवळेकर, नरेश कवळेकर, प्रशांत चोडणकर, रोहित नार्वेकर, संदेश ठाणेकर, विशाल फुलारी, ॲड. गौरीश गावकर, गौतम गावकर, पूर्णेश नाईक, दया सावंत, नवनाथ मांद्रेकर, उमेश कारबोटकर, यश घाटवळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी ॲड. अजय प्रभुगावकर यांना समर्थन दिले.
कार्यकर्त्यांची बैठक
येथील ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रातील सभागृहात काँग्रेसचे मये (mayem) मतदारसंघातील प्रभारी प्रा. अनंत पिसूर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी डिचोलीत कार्यकर्त्यांची एक बैठक झाली. या बैठकीस काँग्रेसचे संभाव्य उमेदवार ॲड. अजय गावकर, काँग्रेसचे (Congress) मये गटाध्यक्ष राजेश गावकर, पिळगावचे माजी सरपंच दिलीप गावस, सेसा कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर आणि विनोद धुरी व्यासपिठावर उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.