Mayem Land News Dainik Gomantak
गोवा

Mayem: मयेवासियांसाठी आनंदाची बातमी! मिळणार जमिनींचा हक्क; अर्ज भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या..

Mayem land ownership rights: स्थलांतरीत मालमत्ताप्रश्नी घरांसह जमीनींचा हक्क मिळण्यापासून वंचित राहिलेल्या मयेवासियांना आता हा हक्क मिळणार आहे. सरकारने तशी संधी उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे.

Sameer Panditrao

डिचोली: स्थलांतरीत मालमत्ताप्रश्नी घरांसह जमीनींचा हक्क मिळण्यापासून वंचित राहिलेल्या मयेवासियांना आता हा हक्क मिळणार आहे. सरकारने तशी संधी उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे.

मये स्थलांतरीत मालमत्तासंदर्भात दुरुस्ती कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२४ पूर्वी ज्यांनी घरे बांधली आहेत आणि मालकी हक्कापासून वंचित राहिलेल्या घरमालकांना आता हक्क मिळवण्यासाठी अर्ज करण्याची संधी मिळणार असल्याची माहिती डिचोलीचे उपजिल्हाधिकारी नेहाल तळवणेकर यांनी दिली.

या योजनेंतर्गत घर आणि जमीनींचा हक्क मिळण्यासाठी वंचित मयेवासियांना अर्ज भरून आवश्यक कागदपत्रासह डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात द्यावे लागणार आहेत. येत्या गुरुवारी १० जुलैपासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. नव्वद दिवसपर्यंत अर्थातच ७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुभा आहे.

अशी माहिती उपजिल्हाधिकारी तळवणेकर यांनी दिली. आवश्यक माहितीअभावी किंवा नजरचुकीने म्हणा घर आणि जमीनीसंदर्भात हक्क मिळवण्यापासून मयेतील काहीजण वंचित असल्याचे निदर्शनास आल्यानेच ही तरतूद करण्यात आली आहे. अशी माहिती देण्यात आली.

७५३ अर्ज निकालात

सुधारीत कायद्यानुसार स्थलांतरीत मालमत्तेंर्गत २०१६ ते २०२१ या कालावधीपर्यंत दिलेल्या मुदतीत घरांचा मालकीहक्क मिळवण्यासाठी मयेतील ८५३ जणांनी अर्ज सादर केले होते. त्यातील ७५३ अर्ज निकालात काढून त्यांना सनद देण्यात आली आहे. तर जमीनसंदर्भात ४९७ अर्ज आले असून १५० अर्जांसंदर्भात नोटीसी देण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तळवणेकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहन पार्किंगचे दर वाढले!

Purple Fest: आमीरसोबत 'सितारे जमीन पर'ची टीम येणार गोव्यात? कलाकारांना केले आवाहन; मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

'गुंड निर्धास्‍त आणि सामान्‍य जनता घाबरली आहे'! सरदेसाईंचे टीकास्त्र; काणकोणकर हल्‍लाप्रकरणी सूत्रधाराचे नाव जाहीर करण्याची मागणी

Chimbel: 'सरकारने हट्टाला पेटू नये, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये', चिंबलवासीय लढ्याच्या तयारीत; युनिटी मॉलला कडाडून विरोध

Thimmappiah Tournament: ..पुन्हा तेंडुलकरने सावरले! गोव्याच्या फलंदाजांची घसरगुंडी; द्विशतकी आघाडीमुळे स्थिती भक्कम

SCROLL FOR NEXT