Vedanta Mining, Mayem Panchayat Dainik Gomantak
गोवा

Vedanta Mining Dispute: मये पंचायत, वेदांता वाद चिघळला! बांधकाम पाडण्याच्या आदेशाला ‘स्थगिती’

Mayem Vaiguinim Panchayat: डिचोली खाण ब्लॉक अंतर्गत येणाऱ्या ‘वेदांता’ खाणीवरील बेकायदा बांधकामे पाडावीत, या मये पंचायतीच्या आदेशाला अनुसरून ‘वेदांता’ने उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळवली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mayem Panchayat Intensifies Protest Against Vedanta ltd illegal constructions

डिचोली: बेकायदा बांधकामाच्या मुद्यावरून मये-वायंगिणी पंचायत आणि ‘वेदांता’ कंपनी यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे.

डिचोली खाण ब्लॉक अंतर्गत येणाऱ्या ‘वेदांता’ खाणीवरील बेकायदा बांधकामे पाडावीत, या मये पंचायतीच्या आदेशाला अनुसरून ‘वेदांता’ने उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळवली आहे. तर दुसऱ्या बाजूने या मुद्यावरून मये पंचायतीने ‘वेदांता’ विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

मये पंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ‘वेदांता’च्या (पूर्वाश्रमीची धेंपे) खाणीवरील एनएसपी प्लांटवर कंपनीने पंचायतीकडून कोणतीही ‘एनओसी’ न घेता वजनकाटा आदी काही बांधकामे बेकायदेशीरपणे केली आहेत, असा पंचायतीचा दावा आहे.

सदर बेकायदेशीर बांधकामे पाडावीत, अशी नोटीस वजा आदेश पंचायतीने ‘वेदांता’ला दिला आहे. या आदेशाच्या विरोधात कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेऊन पंचायतीच्या आदेशाला स्थगिती मिळवली आहे.

सरपंच,पंचांची खाणीवर धडक

कंपनीकडून ''स्थगिती'' आदेश हाती पडताच आज (सोमवारी) दुपारी मये-वायांगिणी पंचायत मंडळाची एक तातडीची बैठक झाली. या बैठकीत वेदांता कंपनीच्या भुमिकेबद्धल पंचायत मंडळाने नाराजी व्यक्त केली. बैठक आटोपताच, सरपंच सीमा आरोंदेकर आणि पंचायत सचिव महादेव नाईक यांच्यासह पंचायत मंडळाने खाणीवर धडक दिली. खाणीवरील बेकायदा बांधकामांची पंचायत मंडळाने पाहणी केली. नंतर संतोष मांद्रेकर आदी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र या अधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाकडे बोट दाखविल्याची माहिती मिळाली आहे.

तोपर्यंत काम बंद ठेवा!

मये पंचायतीच्या आदेशाला वेदांता कंपनीने मिळवलेल्या ''स्थगिती''ची मुदत येत्या ९ डिसेंबर अशी आहे. पुढील निर्णय होईपर्यंत खाणीवरील कामकाज बंद ठेवा, अशी सूचना सरपंच सीमा आरोंदेकर आणि अन्य पंचसदस्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. याप्रकरणी कंपनीला पंचायतीकडून नोटीस पाठविण्यात येणार आहे, असे सरपंच आरोंदेकर यांनी सांगितले. खाणीवर धडक दिलेल्यांमध्ये दिलीप शेट, विद्यानंद कारबोटकर, वासुदेव गावकर, कृष्णा चोडणकर, विशांत पेडणेकर, सुवर्णा चोडणकर, वर्षा गडेकर आदी पंचसदस्यांसह माजी सरपंच विजय पोळे यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT