मये, येथील श्री महामाया हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेने ‘धावा आणि कमवा, धन नव्हे तर आरोग्य’ या संकल्पनेवर आधारीत ‘मये मॅरेथॉन २०२४’चे आयोजन केले.
आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि सामुदायिक भावनेला प्रोत्साहन देण्याचा या मॅरेथॉनच्या आयोजनामागील उद्देश होता. या मॅरेथॉनमध्ये १५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
या मॅरेथॉनमध्ये ३ कि. मी, ५ कि.मी, १० कि.मी व २१ कि.मी या श्रेणींमध्ये सर्व वयोगटातील राज्यातील शाळांसह, विविध क्षेत्रातील सहभागींचा समावेश होता. वेदांत-सेसा गोवा आणि गोवा टुरिझम द्वारे प्रायोजित, या कार्यक्रमाला प्रायोजक, स्वयंसेवक आणि स्थानिक प्राधिकरणांकडून उत्साही पाठिंबा मिळाला.
दमदार संगीत, झुंबा डान्स आणि आयकॉनिक ‘या या मया या’ गाण्याने कार्यक्रमाचा सूर धरला. आमदार प्रेमेंद्र शेट आणि वेदांत लि.चे संतोष मांद्रेकर आदी मान्यवरांनी हिरवा बावटा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ केला.
श्रीमहामाया हायस्कूलच्या मुख्याध्यापिका यांनी ३ किलोमीटर मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आपल्या ५० व्या वयात आमदार प्रेमेंद्र विष्णू शेट यांनी ५ किलोमीटरची मॅरेथॉन वेळेत पूर्ण केली.
वडिलांसाठी चालणे; मुलांसाठी धावणे
वडिलांसाठी मजेदार चालणे आणि लहान मुलांसाठी धावणे हे दिवसाचे सर्वात आकर्षण होते. ५०० हून अधिक शालेय मुलांनी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला.
बक्षीस वितरण समारंभास डॉ सिद्धी कासार, रुपेश ठाणेकर,धीरजकुमार जगदीश, दयानंद कारबोटकर,कुश गणहोत्रा ,शांबा पेडणेकर, अर्जुन नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध श्रेणीतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.