Mayem Lake Road Dainik Gomantak
गोवा

Mayem Lake Road: मये तलावावरील रस्ता खचला; जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास! कंत्राटदाराचा निकृष्ट कारभार चव्हाट्यावर!

Mayem Road Collapse: पावसाच्या तडाख्यात मये येथील तलावाकडील रस्ता खचला असून, दुरुस्तीचे काम केल्यानंतर महिनाभरातच कामाचा निकृष्टपणा समोर आला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: पावसाच्या तडाख्यात मये येथील तलावाकडील रस्ता खचला असून, दुरुस्तीचे काम केल्यानंतर महिनाभरातच कामाचा निकृष्टपणा समोर आला आहे. श्री तळेश्वर मंदिरासमोर तर मोठी समस्या निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, त्या ठिकाणी सध्या या रस्त्यावर चिखलाची दलदल झाली असून, वाहतुकीस मोठी समस्या निर्माण झाली आहे.

सध्या या दलदलमय रस्त्यावरून विशेष करून दुचाकी वाहने चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. बुधवारी दिवसभर पडलेल्या पावसात चिखलाच्या दलदलीमुळे दोन-तीन दुचाकी घसरण्याच्या घटना घडल्या. मात्र, कोणताही अनर्थ घडला नाही, अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.

गेल्या मे महिन्यात जलस्रोत खात्यातर्फे मये तलावाकडील रस्त्याखालील बांधाची दुरुस्ती करण्यात आली आहे. दुरुस्ती करताना बांधाच्या दोन्ही बाजूंनी रस्ता खोदून मोठे पाइप घालण्यात आले आहेत.

या कामानिमित्त जवळपास पंधरा दिवस रस्ता वाहतुकीस बंदही करण्यात आला होता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला होता. त्यानंतर या रस्त्यावरून वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. मात्र, जोरदार पावसामुळे आता समस्या निर्माण झाली आहे. पाइप घातल्यानंतर खोदलेले चर व्यवस्थित बुजवले नसल्यामुळे जोरदार पावसाच्या तडाख्यात दोन्ही बाजूंनी रस्ता खचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT