goa Taxi.jpg
goa Taxi.jpg 
गोवा

टॅक्सी भाड्याचे सुधारित दरपत्रक तयार करण्यासाठी 6 मे अंतिम मुदत

दैनिक गोमंतक

म्हापसा : टॅक्सी भाड्याचे सुधारित दरपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासंदर्भात वाहतूकदार व प्रवासी यांनी स्वत:च्या सूचना व प्रतिक्रिया 6 मेपर्यंत पाठवण्याचे आवाहन वाहतूक खात्याचे संचालक तथा राज्य वाहतूक प्राधिकरणाचे सदस्य-सचिव राजन सातार्डेकर यांनी केले आहे.  हे दरपत्रक यापूर्वी 19  मे 2014 पासून लागू करण्यात आले होते.  ते दरपत्रक आता पुन्हा 14  जानेवारी 2021 च्या राजपत्रात (मालिका1 , क्रमांक 14 ) प्रसिद्ध करण्यात आले असून संबंधित वाहनांच्या इंजिनाच्या क्षमतेनुसार ते दर आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ‘स्वयंचलित वाहन अधिनियम,1988’ अन्वये निश्चित केलेल्या तथा 19  मे 2014  पासून लागू असलेल्या टॅक्सी भाडे दरात सुधारणा करण्याचा राज्य वाहतूक प्राधिकरणाचा प्रस्ताव आहे. हेच दर 14  जानेवारी रोजीच्या अधिकृत राजपत्रात मालिका1 क्रमांक 42 मध्ये पुन्हा प्रकाशित करण्यात आले आहेत. त्या दरपत्रकाची प्रत www.goatransport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (May 6 deadline for transporters and passengers to prepare revised taxi fares) 

टॅक्सी ऑपरेटर, प्रवासी इत्यादींनी त्यांच्‍या सूचना/ टिपणवजा प्रतिक्रिया dir-tran.goa@nic.in ईमेलवर किंवा खात्याच्या विभागीय कार्यालयाद्वारे 6 मे 2021  रोजी किंवा त्या पूर्वी सादर कराव्यात, अशी विनंती राजन सातार्डेकर यांनी केली आहे. वाहतूक खात्याने गोवा सरकारच्या वतीने यासंदर्भातील अधिसूचना १० फेब्रुवारी २०२० रोजी काढली असून व ती अधिसूचना मालिका 2  क्रमांक 47 मध्ये 20 फेब्रुवारी 2020 च्या राजपत्रात या पूर्वी प्रसिद्ध आली आहे. 22  मे 2014 रोजीच्या सरकारी राजपत्रात मालिका 1 क्रमांक 8 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 19  मे २०१४ रोजीच्या शासकीय अधिसूचनेच्या अनुषंगाने राज्य वाहतूक प्राधिकरणाने गोवा राज्यातील कंत्राटी वाहतूकदारांसाठी भाडे दरपत्रक निश्चित केले आहे. पर्यटक टॅक्सी, मोटार कॅब व मॅक्सी कॅब इत्यादी प्रकारच्या वाहनांसाठी हे दरपत्रक आहे.

स्वयंचलित वाहन अधिनियम, 1988 (वर्ष 1988 मधील केंद्रीय कायदा)च्या कलम 68 , उपकलम (1 ) आणि (2 )च्या अनुसार; तसेच, 30  नोव्हेंबर 2017 रोजी राजपत्रात प्रसिद्ध झालेली गोवा सरकारच्या वतीने 23 ऑक्टोबर 2017  रोजी काढलेली अधिसूचना, १४ जून २०१८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध झालेली राज्य सरकारची 5  जून रोजी 2018 ची अधिसूचना आणि 25 ऑक्टोबर 2018 च्या राजपत्रात प्रसिद्ध झालेली गोवा सरकारची24  ऑक्टोबर 2018  रोजीची अधिसूचना यानुसार गोवा सरकारने राज्य वाहतूक प्राधिकरणाची तसेच विभागीय वाहतूक प्राधिकरणांची स्थापना केली होती. गोवा राज्य वाहतूक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी वाहतूक सचिवांची, सदस्य-सचिवपदी वाहतूक संचालकांची, तसेच सदस्यपदी मेरशी येथील प्रमोद प्रभाकर कामत, चिखली-वास्को येथील सेबास्तियांव दामियाव परेरा व घोनेमरड, काकोडा-कुडचडे येथील विश्वास सावंत-देसाई अशा तिघांची नियुक्ती करण्यात आली होती.

तसेच गोवाभरातील दहा विभागीय वाहतूक प्राधिकरणांवर चेअरमनपदी संबंधित जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वाहतूक उपसंचालकांची संचालकपदी, तर सदस्य-सचिवपदी संबंधित विभागातील वाहतूक खात्याच्या साहाय्यक संचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. अशा या विभागीय प्राधिकरणांवर पुढीलप्रमाणे नियुक्ती करण्यात आली होती. पणजी विभाग: संजीव नाईक (एम. जी. मार्ग, पणजी), म्हापसा विभाग: विनय चोपडेकर (पोंबुर्पा), डिचोली विभाग: शशिकांत सावंत (सर्वण-डिचोली), पेडणे विभाग: तुळशीदास गावस (चांदेल-पेडणे), मडगाव विभाग: परेश पांडुरंग नाईक (दवर्ली-नावेली), वास्को विभाग: संजय वामन नाईक (मर्सी कपेलजवळ, वास्को), केपे विभाग: संजय अर्जुन वेळीप (अडणे-बाळ्ळी), काणकोण विभाग: अनिल पांडुरंग कामत (गाळये-पैंगीण), धारबांदोडा विभाग: गंगाराम लांबर (कुळे), फोंडा विभाग: नंदकुमार पुंडलिक डांगी (शांतीनगर-फोंडा). या विभागांच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती संबंधित तालुक्यापर्यंत आहे. डिचोली विभागात सत्तरी तालुक्याचा, तर केपे विभागात सांगे तालुक्याचा समावेश आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT