Rise in temperature Dainik Gomantak
गोवा

दोन दिवसांपासून हवामान स्थिर, अवकाळी पावसाने झोडपले

कमाल तापमान 34 अंशांवर स्थिर, दोन दिवसांनी पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

पणजी : गेले काही दिवस राज्यात अवकाळी पावसाने सर्वांना झोडपले आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तापमानात स्थिरता आहे. हवामान खात्याच्या वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील 24 तासात तापमानात मोठे बदल होणार नाहीत. मात्र, 24 तासानंतर तापमानात 1 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी पणजी येथे कमाल 34.4 अंश सेल्सिअस तर किमान 26.5 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. तर मडगाव येथे कमाल 34.7 अंश सेल्सिअस तर किमान 27.7 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.

सोमवारी समुद्राच्या वाऱ्यामुळे कमाल तापमान 34 अंशांवर स्थिर होते. पुढील दोन दिवस तापमान 34 ते 36 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमानात पुन्हा वाढ होऊ शकते. 5 मेपासून कमाल तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 38 अंशांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे शहरवासीयांना पुन्हा एकदा कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कमाल तापमान 34.2 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. वातावरणातील आर्द्रता सकाळी 77% व सायंकाळी 72% होती. नैऋत्येकडून ताशी 12 किमी वेगाने वारा वाहत होता. विशेष म्हणजे चालू हंगामात कमाल तापमान 42 अंशांवर गेले होते. आता मे महिन्यात पुन्हा एकदा तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT