Goa Weather Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Updates: राजधानी पणजीत विक्रमी तापमानाची नोंद

आजपासून गोव्याचे कमाल तापमानात अंदाजे 2 डिग्री सेल्‍सियसने घट होण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

पणजी: राजधानी पणजीत काल सोमवारी विक्रमी तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान 37.8 तर किमान तापमान 23.4 डिग्री सेल्‍सियस एवढे नोंद करण्‍यात आले. पणजीत सातव्यांदा 37.8 डिग्रीच्‍या वर तापमान गेले आहे. 8 मार्च 2013 रोजी 38 डिग्री सेल्‍सियस एवढ्या तापमानाची नोंद झाली होती. दरम्‍यान, आजपासून कमाल तापमानात अंदाजे 2 डिग्री सेल्‍सियसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने (IMD Goa) वर्तविली आहे. (Goa Weather Updates)

राज्यात मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागतोय. आज एकाच दिवसांत तब्बल 5.5 डिग्री सेल्‍सियसने तापमान वाढल्‍याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.

याबाबत बोलताना हवमान खात्‍याचे अधिकारी राहुल एम. यांनी सांगितले की, वेधशाळेने 11 मार्च रोजीच तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली होती. जेव्हा एखाद्या किनाऱ्यावरील तापमान 37 डिग्री सेल्‍सियसवर पोचते आणि 4.5 ते 6.4 अंशांदरम्यान तापमानाचा इशारा दिला जातो, तेव्हा त्या प्रदेशात उष्णतेची लाट घोषित केली जाते. पणजीचे तापमान वाढल्याने काळजी घेणे जरूरीचे आहे. मात्र उद्यापासून २ डिग्री सेल्‍सियसने तापमानात घट होण्‍याची शक्‍यता आहे. तरीसुद्धा वृद्ध तसेच लहान मुलांनी काळजी घेणे जरूरीचे आहे.

अशी घ्या काळजी

कारणाशिवाय उन्हात जाणे टाळा

फिकट रंगाचे सुती कपडे वापरा

बाहेर फिरताना टोपी, छत्री वापरा

उन्हात काम करताना अधूनमधून विश्रांती घ्या.

भरपूर पाणी प्या, पाण्याची बाटली सोबत ठेवा.

गेल्‍या पाच दिवसांतील

पणजीतील तापमान (डि.से.)

वार दिनांक कमाल किमान

गुरूवार 10 मार्च 33.8 23.6

शुक्रवार 11 मार्च 33.4 25.5

शनिवार 12 मार्च 34.7 24.5

रविवार 13 मार्च 37.4 23.4

सोमवार 14 मार्च 37.8 23.4

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT