Mavin Gudinho Dainik Gomantak
गोवा

दाबोळीतील वाहतूक कोंडीची समस्या दूर करू: माविन गुदिन्हो

दाबोळीतील मतदारांचा मला पूर्ण पाठिंबा मिळेल. असा विश्वास दाबोळीचे भाजपचे उमेदवार मंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्को दाबोळी मतदारसंघाचा विकास 100 टक्के पूर्ण केल्याने मतदारांचे या निवडणुकीत जबरदस्त समर्थन मिळत आहे. पुढील पाच वर्षात दाबोळीचा आणखी विकास साधण्याचे ध्येय मी ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी दाबोळीतील मतदारांचा मला पूर्ण पाठिंबा मिळेल. असा विश्वास दाबोळीचे भाजपचे उमेदवार मंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केला.

गेल्या दहा वर्षात दाबोळीचे आमदार या नात्याने विकासकामांबाबत बोलताना मंत्री गुदिन्हो माहिती देताना म्हणाले की 'दहा वर्षात दाबोळी जनहितासाठी मी विविध पावले उचललेली आहेत.अनेक विकास प्रकल्प पुर्णत्वास आणले आहे. राज्यात सर्वांत प्रथम आधुनिक ग्रामपंचायत इमारत दाबोळीतील चिखली ग्रामपंचायतीसाठी बांधली. इमारतीत 'लिफ्ट'सह सभागृह आणि अन्य विविध साधन सुविधा आहेत. वाडे तालावाचे नूतनीकरण सौंदर्यीकरण, दाबोळी विमानतळाबाहेरील महामार्गावर सुरळीत वाहतूक व्हावी, यासाठी 'ग्रेडसप्रेटर' उड्डाणपूल, चिखली येथे सर्व साधनसुविधेने परिपूर्ण उपजिल्हा इस्पितळ, चिखलीतील 'जॉगर्स पार्क' असे अनेक प्रकल्प पूर्ण करण्यास यश आले. लवकरच जॉगर्स पार्कच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होईल.

लहान मुलांसाठी करमणुकीच्या सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी 'इ लायब्ररी', 'फूड कोर्ट', युवकांसाठी व्यायामशाळा (जीम), आंतरराष्ट्रीय पातळीवरील चांगला 'वॉकिंग ट्रॅक' अशा सुविधा देऊ. 'दाबोळीत 'जॉगर्स पार्क' बाहेर महिला भवन प्रकल्प उभारणार आहे.''पुढच्या पाच वर्षात नवेवाडे ते शांतीनगर येथे वाहतूक कोंडी होते. ही समस्या सोडवण्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेमार्फत शांतीनगर येथे दुसरा पूल बांधला जाईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. दाबोळी ते वेर्णा जंक्शनपर्यंत ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होऊ नये यासाठी या मार्गावर उड्डाणपुलाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर ठेवला. त्यांनी तो मान्य केला आहे. 400 कोटी खर्चून हा प्रकल्प होईल, असे गुदिन्हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT