Mavin Gudinho  Dainik Gomantak
गोवा

कथित वीज घोटाळ्यातून माविन गुदिन्हो सुटणार?

निकाल 30 रोजी : 4.52 कोटींचा घोटाळा, खटला रद्द करण्यास हरकत

दैनिक गोमन्तक

मडगाव: 4.52 कोटींच्या वीज सवलत घोटाळ्यातून सध्याचे पंचायत मंत्री व तत्कालीन वीज मंत्री माविन गुदिन्हो व अन्य संशयित सुटणार की हा खटला सुरूच राहणार यावर 30 जून रोजी निवाडा होणार आहे. आपल्याला खटल्यातून वगळावे, अशी मागणी माविन गुदिन्हो यांच्यासह अन्य सर्व संशयितांनी केली आहे. न्या. व्हिन्सेंट डिसिल्वा हे 30 रोजी या अर्जावर निकाल देणार आहेत.

(Mavin Gudinho and goa alleged power scam)

सरकारी वकील देवानंद कोरगावकर यांनी आज संशयितांच्या या मागणीला तीव्र हरकत घेताना या प्रकरणी जे आरोपपत्र दाखल केले आहे ते कायद्याच्या चौकटीत राहून केले असून, सर्व प्रक्रिया कायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला. संशयितांवर एकदा आरोप निश्चित झालेले असताना संशयितांना सुनावणी न घेता दोषमुक्त करण्याचे कोणतेही प्रवधान कायद्यात नसल्याने हे अर्ज फेटाळून लावावेत अशी मागणी केली.

संशयितांच्यावतीने युक्तिवाद करताना हे प्रकरण भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली असल्याने ते सर्वसाधारण न्यायदंडाधिकाऱ्यांना हाताळण्याचे कुठलेही अधिकार नाहीत. हे प्रकरण प्रथम वर्ग न्यायालयाने हाताळल्याने तांत्रिक मुद्द्यावर संशयितांना दोषमुक्त करावे अशी मागणी केली होती.

2002 साली घडलेल्या वीज सवलत घोटाळा प्रकरणाची सुनावणी आज तब्बल 20 वर्षांनी सुरू झाली होती. दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांच्या न्यायालयात सुरू ती सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT