Mauvin Godinho difficulty increases, witness testimony of both Dainik gomantak
गोवा

मॉविन गुदिन्होंच्या अडचणीत वाढ, दोघांच्या साक्षी नोंद

वीज सवलत घोटाळा प्रकरण 20 वर्षानंतर सुरू

दैनिक गोमन्तक

मडगाव : 2002 साली घडलेल्या वीज सवलत घोटाळा प्रकरणाची सुनावणी आज तब्बल 20 वर्षांनी सुरू झाली असून आज या प्रकरणी दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट सिल्वा यांच्या न्यायालयात सुरू झाली असून आज या प्रकरणात पहिल्या दोन साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून घेण्यात आल्या.

सध्याचे पंचायत मंत्री आणि तत्कालीन विजमंत्री मॉविन गुदिन्हो हे या प्रकरणातील मुख्य संशयित असून या घोट्याळ्याची एकंदर व्याप्ती 4.52 कोटींची आहे.

राज्य सरकारने (government) वीज बिल सवलत देण्याची योजना बंद करूनही गुदिन्हो विजमंत्री असताना कुंकळ्ळी येथील दोन उद्योगांना पूर्वलक्षी पद्धतीने सवलत दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तात्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी ही कारवाई (Action) सुरू केली होती.

या प्रकरणात गुदिन्हो यांच्यासह माजी मुख्य वीज अभियंते टी. नटराजन तसेच ही सवलत ज्यांना देण्यात आल्याचा आरोप आहे त्या मार्मुगाव स्टील्सचे आर. के. राधाकृष्ण व व्ही. एस. भांडारी तसेच बिनानी झिंकचे के. व्ही. कृष्णकुमार हे अन्य संशयित आहेत. या सर्व संशयितांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली खटला चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT