Grants Bail| Mather Murder Case Dainik Gomantak 
गोवा

विलास मेथर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जामीन मंजूर केला

दैनिक गोमन्तक

तोर्डा येथील विलास मेथर हत्याप्रकरणातील आरोपी प्रशांत दाभोळकर आणि इक्बाल नानपुरी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. तोर्डा - पर्वरी येथील विलास मेथर यांच्यावर 14 ऑक्टोबर 2020 रोजी पेट्रोलमिश्रित द्रव्य टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असता त्यांचा मृत्यू झाला. गोव्याच्या इतिहासात दिवसाढवळ्‍या हल्ला करून जिवंत माणसाला जाळण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला होता. त्यामुळे हे प्रकरण बरेच गाजले होते.

या आरोपपत्रात 71 लोकांच्या साक्षी नोंदविल्‍या होत्या. त्यानंतर संशयित यारगट्टी याने न्यायालयात दुसऱ्यांदा जमीन अर्ज दाखल केला होता. तोही न्यायालयाने 9 एप्रिल रोजी फेटाळला. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज दाखल केला. पण, उच्च न्यायालयाने यावेळी त्याचा जमीनअर्ज फेटाळून लावल्‍याची माहिती पोलिस निरीक्षक निनाद देऊलकर यांनी दिली होती.

दरमयान, विलास मेथर हत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत दाभोळकर आणि इक्बाल नानपुरी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज जामीन मंजूर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT