Amaran Star Sivakarthikeyan  Dainik Gomantak
गोवा

Sivakarthikeyan At IFFI: 'पोलिस व्हायचे होते पण.. '; Amaran Star ची Inspiring Journey, सभागृहात टाळ्याशिट्ट्यांची बरसात

IFFI 2024: पडद्यावर त्याची एंट्री झाली की शिट्ट्यांची आणि टाळ्यांची जी बरसात सिनेमागृहात होते. ‘दि इन्स्पायरिंग जर्नी ऑफ शिवकार्तिकेयन’ त्याच्याच तोंडून उलगडताना त्याच्या सरळ आणि साध्या स्वभावाचे होणारे दर्शनही एक प्रकारे उपस्थितांना प्रेरित करत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Sivakarthikeyan At IFFI 2024 Master Class

पडद्यावर त्याची एंट्री झाली की शिट्ट्यांची आणि टाळ्यांची जी बरसात सिनेमागृहात होते. तीच बरसात कला अकादमीच्या सभागृहात ‘फ्रॉम स्मॉल स्क्रीन टू बिग ड्रिम्स’ या विषयावरील ‘मास्टर क्लास अँड इन कन्वर्सेशन’ या सत्रात बोलण्यासाठी जेव्हा तो रंगमंचावर आला तेव्हा झाली. सभागृहात ‘दि इन्स्पायरिंग जर्नी ऑफ शिवकार्तिकेयन’ त्याच्याच तोंडून उलगडताना त्याच्या सरळ आणि साध्या स्वभावाचे होणारे दर्शनही एक प्रकारे उपस्थितांना प्रेरित करत होते.

सिनेमात जरी मी १०० लोकांशी झुंज देणारा सुपरहिरो असलो तरी सिनेमातील तशा प्रकारचे हिरोचे काम हा ‘हिरोईझम’ नाही तर समाजासाठी, देशासाठी आपले जीवन अर्पण करणारे लोकच खरे हिरो असतात, अशा शब्दांत जेव्हा तो विनम्रपणे सत्य सांगत होता तेव्हा त्याच्या मार्दवी स्वभावाला आणि सरळ शब्दांना लाभलेल्या टाळ्यांही तितक्याच अस्सल होत्या. 

कॉलेजमध्ये इतरांची मिमिक्री करणारा विद्यार्थी म्हणून लोकप्रियता लाभलेल्या शिवकार्तिकेयनचे कान पिळण्यापेक्षा त्याच्या शिक्षकांनी त्याला ‘तुझी ही प्रतिभा वाया जाऊ देऊ नकोस’ असा उपदेश केला हे भाग्यच म्हणायला हवे.

अर्थात टीव्हीवर जाण्यासाठी मिमिक्री आर्टिस्ट असणे हे एका प्रकारचे ‘इनव्‍हिटेशन कार्ड’च आहे याची कल्पना शिवकार्तीकेयनलाही होती. त्याशिवाय टीव्हीवर नुसता कलाकार म्हणून येण्यापेक्षा होस्ट म्हणून आलो तर प्रेक्षकांना सलग एक तास आपला चेहरा दिसू शकेल ही जाणीव देखील त्याला होती.

या सत्रात बोलताना शिवकार्तिकेयन म्हणाला, मला फक्त लोकांचे मनोरंजन करायचे होते. टीव्हीवर होस्ट म्हणून काम करताना दर्शकांशी होणारी पर्सनल कनेक्ट ही माझी ताकद होती. सिनेमात हिरो बनण्याचा माझा विचार नव्हता मात्र टीव्हीवरचा मी लोकांना आवडतो हे मला कळले तेव्हा सिनेमात देखील यावे असे मला वाटू लागले.

व्‍हायचे होते पोलिस, झाला अभियंता व नंतर अभिनेता

शिवकार्तिकेयनचे वडील पोलिस सुपरिटेंडेंट होते.‌ त्यांचा पोशाख, त्यांचे रिव्हॉल्‍वर, त्यांचा रुबाब पाहून शिवकार्तिकेयनला देखील आपण पोलिस अधिकारी बनावे असे वाटायचे. मात्र त्याच्या आईला कुटुंबात आणखी एक पोलिस अधिकारी नको होता. शिवकार्तिकेयन इंजिनीअर बनला. दरम्यान, त्याचे वडील वारले व त्याला नैराश्याशी सामना करावा लागला. मात्र त्याच्या आयुष्यात आलेला टीव्ही हा त्याच्या नैराश्यावरचा उतारा ठरला.

शक्‍यतो सोशल मीडियाचा वापर टाळा

तामीळ सिनेमाचा आजचा हा सुपरहिरो आपले कुटुंब महत्त्वाचे मानतो. तो म्हणतो, तुम्ही जगात कुठेही जा, पण शेवटी आपल्या घरट्यात परत या. माझे घर हे माझ्यासाठी एक घरटे आहे. आपल्या मुळांना बिलगून राहणे हेच खूप महत्त्वाचे असते. शिवाय त्याचा सल्ला हा होता की, आपले मन स्वतंत्र असले पाहिजे. आज समाजमाध्यमांचा आपल्यावर खूपच दबाव आहे. हा दबाव आपण झटकला पाहिजे. आपण जेव्हा वैयक्तिकरीत्या एकमेकांना भेटतो तेव्हा खूप सकारात्मक असतो. परंतु समाजमाध्यमांवरून जेव्हा एकमेकांशी संवाद साधतो तेव्हा त्यात नकारात्मकताच अधिक असते. त्‍यामुळे शक्‍यतो समाजमाध्यमे टाळा, असा सल्ला शिवकार्तिकेयन याने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Goa Live News: कळंगुट येथील चोरीप्रकरणी एकास अटक, 3 लाखांचा मुद्देमालही जप्त!

Kartik Aaryan: ना गाजावाजा न कसाला धिंगाणा; कार्तिकने गोव्यात शांततेत साजरा केला वाढदिवस पाहा Photo, Video

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात चहा, कॉफीसारखे गरम पेय का टाळावेत?

Cash for Job Scam: त्या 'मॅडम'ला पकडून देण्याचा गोमंतकीयांनी निर्धार केलाय! Cash For Job प्रकरणावरुन सरदेसाई पुन्हा बरसले

SCROLL FOR NEXT