Mumbai Goa Highway Traffic Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक मोठी कोंडी, रस्त्यातच खोळंबले पर्यटक

Mumbai Goa Highway: महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे पर्यटकांना मार्गावर ताटकळत थांबावे लागत आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Traffic Jam

रायगड: नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकण आणि गोव्यात दाखल होत आहेत. पण, इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वी पर्यटकांना मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून या महामार्गावर वाहनांची वर्दळ पाहायला मिळत आहे. नव्या वर्षाच्या तोंडावर देखील या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा आणि कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होताहेत. मुंबई - गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्याने लोणेरे, माणगाव आणि इंदापूर पोयनाड येथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे पर्यटकांना मार्गावर ताटकळत थांबावे लागत आहे.

थर्टी फर्स्टच जल्लोष आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण गोवा आणि कोकणात येत आहेत. तसेच, रायगडमधील अलिबाग येथे जाण्यास पसंती देत आहेत. दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावरुन जाताना पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ख्रिसमस, सनबर्न आणि थर्टी फर्स्टसाठी अनेकजण गोव्यात येत होते. त्यामुळे २५ डिसेंबरपासून महामार्गावर कोंडी निर्माण होत होती. आज पाचव्या दिवशी देखील कोंडी सुरुच असल्याचे चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT