Fire in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Forest Fire : गोव्यात जळलेल्या जंगल पट्ट्यासाठी आता काही करता येणार नाही; तज्ञ म्हणतात आता निसर्गच...

जंगलांना लागलेल्या आगींमुळे गोवेकरांच्या बागायतींचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेच मात्र जैव विविधतेचेही नुकसान होत आहे.

Kavya Powar

गोव्यात सुरू असलेले अग्निसत्र दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. जंगलांना लागलेल्या आगींमुळे गोवेकरांच्या बागायतींचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेच मात्र जैव विविधतेचेही नुकसान होत आहे.

गोव्याच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे जळत असलेली जैवविविधता आपण आता कायमची गमावली आहे. शिवाय हा सदाहरित पश्चिम घाट पुन्हा निर्माण व्हायला काही वर्षे लागू शकतात, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

जळलेल्या जंगलाच्या पट्ट्यांच्या जीर्णोद्धारासाठी आता काहीही करता येणार नाही. आता आपण फक्त निसर्ग पुन्हा कधी पाहिल्यासारखा होतो याची वाट बघू शकतो. हे सर्व आता निसर्गावरच सोडले पाहिजे, असे पद्मश्री पुरस्कार विजेते ए जे टी जॉनसिंग जे संरक्षणवादी आणि डेहराडूनस्थित भारतीय वन्यजीव संस्थेचे माजी डीन आहेत ते म्हणाले.

गोव्याचे माजी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सालेलकर म्हणाले की, जंगल पूर्ववत झाल्यावर मोठे प्राणी जे सध्या सुरक्षित स्थळी गेले आहेत ते पुन्हा जंगलात परततील. मात्र लहान वनस्पती आणि प्राणी, जे जळून गेलेत ते आता कायमचे नष्ट झाले आहेत.

तज्ज्ञांनी सांगितले की, जंगलातील आगीच्या अशा प्रकरणांमध्ये, एकदा नुकसान झाले की, पुनर्संचयित करण्यासाठी फार कमी किंवा कोणतेही प्रभावी उपाय लागू केले जाऊ शकत नाहीत. पुढील काही वर्षांमध्ये उन्हाळ्यात आगीची पुनरावृत्ती झाली नाही, तर नैसर्गिक पुनर्संचयित होण्यासाठी यापुढे कमीत कमी पाच वर्षे लागतील.

दरम्यान, गेल्या आठवड्याभरापासून राज्यात सुरू असलेले अग्नितांडव अद्याप सुरूच आहे. म्हादई अभयारण्यात अजूनही 11 ठिकाणी सक्रिय आग आहे. ही आग शमविण्यासाठी वन विभागासह हवाई, नौदल आणि अग्निशमन दल सक्रिय असले, तरी ही आग विझविण्यात त्यांना यश आलेले नाही.

तथापि, कोपार्डे येथे जंगलाला आग लागल्याप्रकरणी एकनाथ सावंत याला अटक केली आहे. आग दुर्घटनेची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून भारतीय वन सर्वेक्षण संस्थेला (एफएसआय) आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी आणि पोलिस दल सक्रिय केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'गॅस सिलिंडर'च्या वादातून जीवघेणा हल्ला; 3 आरोपींना पकडण्यासाठी गोवा पोलिसांचे राजस्थानात धाडसत्र

Viral Video: 'आता घरी चल, मग बघतेच...!' चालत्या बाईकवर बायकोची नवऱ्याला बुक्क्यांनी मारहाण; रोमँटिक गाण्यासह व्हिडिओ व्हायरल

कोवळ्या मुला – मुलींच्या तस्करीचा डाव उधळला; गोव्याकडे येणाऱ्या 13 जणांची वास्को – द – गामा ट्रेनमधून सुटका

Diwali Goa Trip: 10 हजारांच्या बजेटमध्ये गोवा दर्शन! दिवाळीत 'नरकासूर दहन' आणि समुद्रकिनाऱ्यांचा आनंद 3 रात्री/ 4 दिवसांत घ्या, अशी करा ट्रिप प्लॅन

Mayem Lake: पुन्हा उघडतोय मयेचा तलाव, आमदार प्रेमेंद्र शेट यांनी स्वतः केली पाहणी; नेमकी तारीख काय? वाचा 

SCROLL FOR NEXT