Mascot Launch Ceremony of the 37th National Games Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Moga Is Finally Here: अखेर शोध थांबला.... 'मोगा' जल्लोषात अवतरला...

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या शुभकराचे अनावरण

गोमन्तक डिजिटल टीम

Mascot Launch Ceremony of the 37th National Games Goa 2023: यंदाची 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गोव्यात गेल्या काही दिवसांमध्ये एकच प्रश्न विचारला जात होता तो म्हणजे where is Moga? (मोगा कुठे आहे?)

सोशल मीडिया, व्हिडिओ या माध्यमातुन लहान मुले, खेळाडू, सेलिब्रिटी, राजकीय नेते, अगदी मुख्यमंत्री देखील सतत हेच सांगत होते की मोगा (Moga) हरवला आहे. त्याला शोधले पाहिजे. पण मोगा आहे कुठे? हाच प्रश्न गेले काही दिवस सतत कानावर येत होता.

त्यामुळे मोगा बाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर रविवारी या प्रश्नांचे उत्तर गोवेकरांना मिळाले.

गोवा क्रांती दिनाचे निम्मित साधून शेकडो गोवेकरांच्या उपस्थितीत मोगा गोवेकरांच्या समोर अवतरला. रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या जल्लोषात या स्पर्धेच्या शुभंकरचे अनावरण करण्यात आले. इंडियन बायसन तथा गवा हा या स्पर्धेचा शुभंकर आहे. हा गोव्याचा राज्य प्राणी देखील आहे.

कार्यक्रमाची सुरवात स्थानिक कलावंतांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. यावेळी गेट सेट गोवा हे रॅप सॉन्ग देखील सादर करण्यात आले.

जुडेंगे, जियेंगे, जीतेंगे हे या स्पर्धेचे ब्रीद वाक्य आहे.

‘रुबीगला’ असे स्पर्धेच्या शुभंकराचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने पणजीत भव्यदिव्य कार्यक्रमात त्याचे आगमन झाले होते, मात्र नंतर ती स्पर्धा रद्द झाली आणि ‘रुबीगला’ विस्मरणात गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT