Road Transport Dainik Gomantak
गोवा

Road Transport: मार्ना-शिवोली बाजारातील रस्त्याचे अखेर रुंदीकरण होणार

वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरलेल्या मार्ना शिवोलीचा बाजार रस्ता ते थियेटर जंक्शन पर्यतच्या रस्त्याचे अखेर रुंदीकरण करण्यात येणार असून आमदार दिलायला लोबो यांनी या भागाची पाहणी केली.

दैनिक गोमन्तक

Road Transport: वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरलेल्या मार्ना शिवोलीचा बाजार रस्ता ते थियेटर जंक्शन पर्यतच्या रस्त्याचे अखेर रुंदीकरण करण्यात येणार असून नुकतीच आमदार दिलायला लोबो यांनी सरपंच शर्मिला वेर्णेकर तसेच स्थानिक ग्रामस्थांसह या भागाची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत सेंट अँथोनी चर्चचे धर्मगुरू मेंडिस, सार्वजनिक बांधकाम खाते, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गोवा स्वातंत्र्यानंतर या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण हाती घेण्यात आले नव्हते त्यामुळे चौपटीने वाढत चाललेल्या वाहतुकीवर त्याचा प्रचंड ताण पडत होता.

आधीच अरुंद असलेल्या रस्त्यात दुतर्फा वाहने चालवताना वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गोची होत होती. त्यामुळे वाहनचालकांची बाचाबाची तसेच भांडणे हे नित्याचेच प्रकार झालेले होते.

दरम्यान, येथील रस्त्याच्या दुतर्फा असलेली घरे, दुकाने यामुळे या भागात वाहनचालकांची मोठी कसरत होत असे. पर्यटन काळात अरुंद रस्त्यांमुळे या भागातील वाहनांच्या रांगा पाच-पाच किलोमीटरपर्यंत लागलेल्या दिसून आल्या. भविष्याचा विचार करून येथील मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर हाती घेण्याची मागणी होत होती.

या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण हाती घेतल्यास रस्त्याला लागून असलेली अनेकांची घरे तसेच दुकाने पाडावी लागणार असल्याने आधीच्या राजकारण्यांनी याबाबतीत चुप्पीच धरली होती.

परंतु विद्यमान आमदार दिलायला लोबो तसेच स्थानिक मार्ना-शिवोली पंचायत मंडळाच्या सहकार्याने येथील रस्त्यांचे रुंदीकरण शक्यतो लवकर हाती घेण्यात येणार असल्याचे आमदार दिलायला लोबो यांनी दै. गोमन्तकशी बोलताना सांगितले.

शिवोलीतील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्‍न कित्येक वर्षे रेंगाळत पडला होता. गावची लोकसंख्या दुप्पटीने वाढली. वाहनेही वाढली; परंतु रस्ते मात्र आधीचेच आहेत. त्यामुळे या भागात वाहने चालवताना नाकीनऊ यायचे.

आमदार दिलायला लोबो यांनी याप्रश्‍नी प्रामुख्याने लक्ष घातले. कितीही विरोध झाला तरी भविष्याचा विचार करून या भागातील रस्ता रुंदीकरण करण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले होते. त्यानुसार संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सोमवारी येथील जुन्या रस्त्यांची तसेच परिसराची पाहणी करण्यात आली. - शर्मिला वेर्णेकर, सरपंच

मार्ना-शिवोली बाजारातील बहुतेक दुकाने स्थानिक चर्च संस्थेच्या ताब्यात येतात. त्यामुळे रस्ता रुंदीकरण कामात चर्चकडून जे सहकार्य हवे ते देण्यास मी आणि चर्च संस्था बांधील आहे. याभागात नियमित होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आपण येथील चर्चचा कंपाऊड तोडून तो आत घेण्यास तयार आहे. - फा. मेंडीस, चर्चचे धर्मगुरू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT