margao municipality  dainik gomantak
गोवा

Margao News : मडगावमधील दुकानांचे हस्तांतरण केवळ रक्ताचे नाते असलेल्यांनाच

बाजार समितीतर्फे सोमवारी मडगाव मार्केटचे सर्वेक्षण

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News : मडगाव नगरपालिकेच्या बाजार समितीची बैठक आज (ता.२४) पार पडली. या बैठकीत केवळ चार मुद्दे होते. त्यावर चर्चा करण्यात आली. बाजारामधील दुकानांचे यापुढे केवळ रक्ताचे नाते असलेल्यांनाच हस्तांतरण करता येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

समितीचा हा निर्णय नगरपालिकेच्या कौन्सिलच्या बैठकीत मांडला जाईल व नंतर त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल. तसेच ज्या दुकानदारांना आपली दुकाने दुरुस्त करायची असतील त्यांना केवळ नगरपालिकेने जी जागा दिली आहे तेवढीच दुरुस्ती करण्याची परवानगी दिली जाईल.

सोमवारी मडगाव मार्केटला भेट देऊन सर्वेक्षण केले जाईल. यावेळी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व इतर अधिकारीही बरोबर असतील, असे उपनगराध्यक्ष तथा बाजार समितीच्या अध्यक्षा दीपाली सावळ यांनी सांगितले.

मार्केटमध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न

मार्केटमध्ये दुकानदारांनी आपली जागा सोडून बाहेरील जागा व्याप्त करून आपले साहित्य तेथे ठेवले आहे. त्यामुळे लोकांना मोकळेपणे फिरणेही कठीण झाल्याचे दिसून आले आहे. आम्ही मार्केटमध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे उपनगराध्यक्ष दीपाली सावळ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT