Goa Police Dainik Gomantak
गोवा

Margao Police: मडगाव पोलिसांची जामा मशिद समितीसोबत विस्ताराने चर्चा

Margao Police: आज ठरणार जुलूसचा मार्ग:अनंत चतुर्दशी, ईद-ए-मिलाद एकाच दिवशी

दैनिक गोमन्तक

Margao Police: अनंत चतुर्दशीच्‍या दिवशी होणारे 11 व्‍या दिवसांच्‍या गणेश विसर्जनाची मिरवणूक आणि महमंद पैगंबर जयंतीनिमित्त मडगावात मुस्‍लिम समाजाकडून काढण्‍यात येणारा जुलूस, या दोन्‍ही मिरवणुका २८ सप्‍टेंबर रोजी एकाच दिवशी येत असल्‍याने या मिरवणुकीच्‍यावेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मडगाव पोलिसांनी खबरदारीचे उपाय घेतले आहेत.

त्‍याचाच एक भाग म्‍हणून सासष्‍टीचे पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी आज जामा मशिदीच्‍या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. जुलूस सांयकाळी 6 वाजेपर्यंत आटोपता घ्यावा,अशी सूचना आयोजकांना करण्‍यात आली.

यावेळी जामा मशिदीचे अध्‍यक्ष उर्फान मुल्‍ला आणि अन्‍य पदाधिकारी उपस्‍थित होते. उद्या 26 सप्‍टेंबर रोजी या जुलूसचा मार्ग ठरविण्‍यासाठी दक्षिण गोवा जिल्‍हाधिकाऱ्यांबरोबर बैठक ठेवण्‍यात आली आहे. दरवर्षी ही जुलूसची मिरवणूक मालभाट येथील जामा मशिदीकडून सुरू होते आणि हॉस्‍पिसियो मार्गे रवींद्र भवनकडे जाऊन तिथे तिचे विसर्जन होते.

ही मिरवणूक सायंकाळी 6 वाजेपर्यंत आटोपती घ्‍यावी, अशी विनंती उपअधीक्षक देसाई यांनी मुस्‍लीम प्रतिनिधींना केली. जेेणेकरून सायंकाळी सहा वाजल्‍यानंतर सुरु होणार्‍या गणेश विसर्जन मिरवणुकीत त्‍याचा व्‍यत्‍यय येणार नाही.

लोकांनी गर्दी टाळावी !

यंदाच्‍या जुलूस व विसर्जन मिरवणुकीला लोकांनी गर्दी करणे टाळावे, तसेच या मिरवणुकीत जी वाहने चालविली जातात ती नियंत्रितरित्‍या चालविली जावीत, अशीही सूचना करण्‍यात आल्‍याचे पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT