Margao News Dainik Gomantak
गोवा

South Goa Session Court : युवतीला वेश्‍‍याव्‍यवसायास जुंपणाऱ्या दलालास दीड वर्षाच्‍या कैदेची शिक्षा

पोलिसांनी आवश्‍‍यक ते पुरावे न्‍यायालयासमोर सादर केल्‍याने संशयिताचा गुन्‍हा सिद्ध

गोमन्तक डिजिटल टीम

Margao : नोकरी देतो असे सांगून दिल्‍लीत राहणाऱ्या एका बिहारच्‍या युवतीला गोव्‍यात आणून तिला येथे वेश्‍‍याव्‍यवसायात जुंपण्‍याचा आरोप असलेला दिल्‍लीतील दलाल अभिषेक मेहरा याला दक्षिण गोव्‍याच्‍या अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश पूजा कवळेकर यांनी अनैतिक व्‍यवहार प्रतिबंध कायद्याच्‍या कलम ४ खाली दोषी ठरवून दीड वर्षाच्‍या कैदेची शिक्षा ठोठावली. त्‍याने शिक्षेचा काळ याआधीच कोठडीत घालविल्‍यामुळे त्‍याची ही मुदत कैद असे गृहीत धरण्‍यात आले.

याप्रकरणी सरकारी वकील म्‍हणून उत्‍कर्ष आवडे यांनी बाजू मांडताना नऊ साक्षीदार सादर करून गुन्‍हा सिद्ध केला. मात्र, संशयितावरील मानवी तस्‍करीचा गुन्‍हा सिद्ध होऊ शकला नाही. कोलवाचे तत्‍कालीन पोलिस निरीक्षक नेल्‍सन कुलासो यांनी या प्रकरणात तपास केला होता.

या प्रकरणाची पार्श्र्वभूमी अशी की, ८ ऑक्‍टोबर २०२० या दिवशी सेर्नाभाटी-कोलवा येथे कोलवा पोलिसांनी छापा टाकून या युवतीची सुटका केली होती.

अभिषेक मेहरा याने आपल्‍याला फसवून गोव्‍यात आणून हा व्‍यवसाय करण्‍यास भाग पाडले, अशी जबानी तिने दिली होती.

त्‍यानंतर कोलवाचे तत्‍कालीन पोलिस निरीक्षक नेल्‍सन कुलासो यांनी संशयिताला अटक करून त्‍याच्‍याविरोधात न्‍यायालयात खटला दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आवश्‍‍यक ते पुरावे न्‍यायालयासमोर सादर केल्‍याने संशयिताचा गुन्‍हा सिद्ध झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा काँग्रेस नेत्यांना घेतलं ताब्यात

Goa Congress Protest: 28 मतदार एकाच खोलीत? निवडणूक अधिकाऱ्यांची अचानक नेमणूक; काँग्रेसचा मोठा आरोप

Govt Raises Gambling Fines: सरदेसाईंच्या स्टिंग ऑपरेशननंतर सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर, जुगार दंडात केली मोठी वाढ

Cutbona Jetty: कुटबण जेटीवर SOP लागू! मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन; कामगारांची तपासणी सुरू

Bhausaheb Bandodkar: गोवा मुक्त होण्यापूर्वी, अनेक भागांत ‘भाऊसाहेब’ हे नाव लोकप्रिय होते..

SCROLL FOR NEXT