Margao Traffic Police : Dainik Gomantak
गोवा

Margao Traffic Police : ५ महिन्‍यांमध्ये ९ लाख रुपयांची दंड वसुली; मडगाव वाहतूक पोिलसांची कारवाई

Margao Traffic Police : धूम स्‍टाईलने वाहने चालविणाऱ्यांवर मडगाव वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत चालू वर्षाच्‍या पहिल्‍या पाच महिन्‍यांत जानेवारी ते २९ मे पर्यंत अतिवेगाने वाहने हाकणाऱ्या १,१६८ जणांकडून ९ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Traffic Police :

मडगाव, सुसाट वेगाने वाहने हाकल्‍यामुळे राज्‍यात अपघात वाढत असून या वेगाला आळा घालण्‍यासाठी आता पोलिसांनीही मोहीम सुरू केली आहे.

धूम स्‍टाईलने वाहने चालविणाऱ्यांवर मडगाव वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत चालू वर्षाच्‍या पहिल्‍या पाच महिन्‍यांत जानेवारी ते २९ मे पर्यंत अतिवेगाने वाहने हाकणाऱ्या १,१६८ जणांकडून ९ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

चालू वर्षाच्‍या पहिल्‍या पाच महिन्‍यांत जानेवारी ते २९ मे पर्यंत वेग मर्यादेचे उल्‍लंघन करणाऱ्या ११६८ वाहन चालकांवर कारवाई केली

आहे.

वाहनांची गती मोजण्‍यासाठी सध्‍या पोलीस स्‍पीड गनचा वापर करीत आहेत. या स्‍पीडगनद्वारे साधारणतः एक कि.मी. अंतरावरून वाहनाचा वेग मोजणे शक्‍य होते. त्‍यामुळे समोर वाहतूक पोलीस दिसल्‍यानंतर वाहनाचा वेग कमी करून काहीही साध्‍य होत नाही, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी दिली.

मडगाव शहरात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी विशेषतः अतिवेगाने वाहने हाकणाऱ्यांवर नजर ठेवण्‍यासाठी पोलिसांकडे एक स्‍पीडगन आहे असे त्‍यांनी सांगितले.

महिनावार कारवाई

महिना कारवाया दड वसूल

जानेवारी २७४ २,७३,५००

फेब्रुवारी २०३ २,०५,०००

मार्च २६५ २,६३,५००

एप्रिल २२६. २,२२,०००

मे. १९८. १,९८,०००

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Unseasonal Rain: वाळपईत अवकाळीचा कडाका! अचानक आलेल्या पावसाच्या सरींनी नागरिकांची उडाली दाणादाण

Konkan Railway: कोकणवासियांसाठी गुड न्यूज! मुंबई ते मडगाव विशेष गाडी जाहीर; 'या' 23 स्थानकांवर असणार थांबा, पाहा वेळापत्रक

Rajasthan Royals Sale: IPL इतिहासातील सर्वात मोठी डील! 15 हजार कोटींना विकली गेली 'राजस्थान रॉयल्स'; कोण आहे नवा मालक?

Honda: सफर गोव्याची! सर्वांचे स्वागत करणारे, मोठ्या जंक्शनचे काम करणारे 'होंडा' गाव

Mangaladitya Rajyog 2026: सूर्य-मंगळाची युती, 2 एप्रिलपासून मंगलादित्य राजयोगाचा चमत्कार; 3 राशींवर होणार धनाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT