Margao Cuncolim NH66 widening Dainik Gomantak
गोवा

Margao Cuncolim Road: कुंकळ्ळी -चिंचोणे ग्रामस्थ उतरले रस्त्यावर! महामार्ग रुंदीकरणास विरोध; घरे, वस्ती नष्ट होण्याची भीती व्यक्त

Margao Cuncolim NH66 widening: मडगाव ते कुंकळ्ळी राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. हे रुंदीकरण लोकांची जी घरे व वस्ती आहे, तेथूनच केले जाणार आहे. त्यास लोकांचा विरोध आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: मडगाव ते कुंकळ्ळी राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. हे रुंदीकरण लोकांची जी घरे व वस्ती आहे, तेथूनच केले जाणार आहे. त्यास लोकांचा विरोध आहे. जर रस्ता रुंद केला तर येथील ग्रामस्थांना अडचणीचे ठरणार आहे, त्याबाबत चिंचोणे सरपंच, पंच सदस्यांनी आमदार सिल्वा यांच्याशी रूंदीकरणानंतरच्या दुष्परिणामाबाबत चर्चा केली.

स्थानिकांनी दुसऱ्या बाजूने रस्त्यासाठी पर्यायी जागा दाखवली आहे. पण अजून त्यावर काहीही निर्णय झालेला नाही. त्यासाठी स्थानिकांनी रस्त्यावर एकत्रित होऊन आपला निषेध व्यक्त केला. यावेळी आमदार क्रुझ सिल्वा, चिंचोणेचे सरपंच फ्रॅंक व्हिएगश व पंच सदस्य उपस्थित होते.

आमदार क्रुझ सिल्वा म्हणाले, आपण या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्याकडे चर्चा केली आहे. आम्ही सरकारला या संदर्भात भूमिका काय? ते स्पष्ट करण्यास सांगितले आहे. या रस्त्यासाठी निविदा जाहीर केली आहे. जर रस्ता याच बाजूने करण्याचा निर्णय घेतला, तर सर्व लोक रस्त्यावर येतील, त्यांना आपला पाठिंबा असेल.

सरपंच फ्रॅंक व्हिएगश म्हणाले, मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सुद्धा त्यांना याबद्दलच्या परिस्थितीची माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हांला रुंदीकरणासाठी जी पर्यायी जागा दाखवली आहे, ती कोमुनिदादची आहे. कोमुनिदादकडून ‘ना हरकत’ दाखला सादर करण्यास सांगितले. आम्ही तो दाखला सुद्धा सादर केला आहे. मात्र सरकार अजून त्यावर काहीही निर्णय घेत नाही, असे व्हिएगश यांनी सांगितले

जनमताचा आदर करा!

मनीषा पै या स्थानिक महिलेने सांगितले, की हा प्रश्न २००३ पासून सुरू आहे. आम्ही जी पर्यायी जागा दाखवली आहे, तेथील लोकांना सुद्धा रस्ता गेल्यास हरकत नाही. अशा परिस्थितीत सरकार विलंब का करीत आहे, हेच कळत नाही. सरकारने जनमताचा आदर करावा, त्यानुसार कृती करायला हवी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT