Railway Accident News Dainik Gomantak
गोवा

Margao: गाडी सुटली म्हणून धावत आले आणि रेल्वेखाली सापडले; मडगावातील व्यावसायिकाचा मृत्यू; कारवार स्थानकावरील दुर्दैवी घटना

Karwar Railway Accident: रायकर हे पूर्वी कोंब येथे राहत होते. सध्या त्यांचे वास्तव पांडवा कपेल येथे होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली. त्यांचा टेम्पो ट्रॅव्हलचा व्यवसाय होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Businessman Dies in Karwar Railway Accident

मडगाव: आपल्या पत्नीसमवेत केरळ येथील शबरीमाला येथे देवदर्शनासाठी निघालेले रामानंद रायकर (५५) या मडगावातील टेम्पो ट्रॅव्हल व्यावसायिकाचा गुरुवारी (ता. १३) रात्री साडेआठच्या दरम्यान कारवार रेल्वे स्थानकावर रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार कारवार रेल्वे स्थानकावर रेल्वेने थांबा घेतल्यानंतर रायकर हे पाण्याची बाटली आणण्यासाठी रेल्वेतून खाली उतरले होते. काही वेळाने रेल्वे पुढील प्रवासासाठी निघाली असता, रेल्वे पकडण्यासाठी ते धावत आले व धावत्या रेल्वेत त्यांनी चढण्याचा प्रयत्न केला.

परंतु या गडबडीत ते खाली पडले व रेल्वे अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. कारवार कोंकण रेल्वे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अनैसर्गिक मृत्यू म्हणून हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. 

रायकर हे पूर्वी कोंब येथे राहत होते. सध्या त्यांचे वास्तव पांडवा कपेल येथे होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली. त्यांचा टेम्पो ट्रॅव्हलचा व्यवसाय होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT