Margao Gandhi Market Dainik Gomantak
गोवा

'मडगाव' दुकानांच्या लिलावात घोटाळा

गांधी मार्केटातील प्रकार: व्यवहाराची दक्षता खात्याद्वारे चौकशीची मागणी

दैनिक गोमन्तक

मडगाव: सध्या मडगावच्या गांधी मार्केटमध्ये असलेल्या दुकानांच्या लिलावात जो घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे, त्यात सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच या साऱ्या व्यवहाराची दक्षता खात्याद्वारे चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गांधी मार्केटात अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या दुकानातून प्रति महिना किमान 10 ते 15 हजार भाडे पालिकेला मिळू शकते, असे असतानाही दरमहा 1900 रुपयांच्या भाड्यावर ही दुकाने लिलावातून दिली गेली आहेत. दुकानांच्या भाड्याचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दरानुसार करण्यात आल्याचा खुलासा यापूर्वी नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी केला आहे.

या लिलावाला विरोध करून ही लिलाव प्रक्रिया पुन्हा करावी अशी मागणी करणारे नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी या घोटाळ्यामागे सत्ताधारी नगरसेवकांचा हात असल्याचा आरोप केला. शिरोडकर म्हणाले, दोन नगरसेवकानी दुसऱ्याच कुणाला पुढे काढून हा लिलाव करून घेतला आहे. पण मिळत असलेल्या माहितीनुसार ही दुकाने नगरसेवकच चालविणार आहेत. त्यामुळेच आम्हाला या प्रकरणी शंका येत आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी अशी मागणी करणारे नगरसेवक सदानंद नाईक यांनीही अशीच शंका व्यक्त केली. नाईक म्हणाले, या दोनपैकी एका दुकानाच्या मालकाने पालिकेचे १७ लाख रुपये थकवून ठेवले आहेत. खरे तर पालिकेने ही थकबाकी वसूल करण्याची गरज होती. पण ही रक्कम वसूल न करताच त्याच दुकान मालकाच्या बहिणीला नव्याने हे दुकान भाड्याने देण्याचा ठराव घेतला आहे. पूर्वीच्या मालकाची थकबाकी किती आहे हे विचारल्यास त्याची फाईल सापडत नाही असे सांगितले जाते. त्यामुळेच हा सर्व व्यवहार म्हणजे घोटाळा असल्या सारखे वाटत असून त्यामुळेच या साऱ्या व्यवहाराची दक्षता खात्याकडून चौकशी केली जावी, अशी माझी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT