Goa State Pollution Control Board Dainik Gomantak
गोवा

Pollution Control Board: चार मांस विक्रेत्यांचे नोटिसांना आव्हान; २१ जणांचे गोवा प्रदूषण मंडळाकडे परवान्यासाठी अर्ज

Goa State Pollution Control Board: चार मांस विक्रेत्यांनी त्यांना पाठविलेल्या नोटिसांना आव्हान दिले आहे; त्यांनी प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे अर्ज केल्याचे कळते

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: मडगावच्या एसजीपीडी मार्केटमधील २७ पैकी २१ मांस विक्रेत्यांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवान्यासाठी अर्ज केले आहेत. हल्लीच गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने या मांस विक्रेत्यांना नोटिसा पाठवल्या होत्या. नंतर या विक्रेत्यांनी पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या नोटिसांबद्दल चर्चा केली होती. तेव्हा पर्यावरणमंत्र्यांनी त्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवाने आणण्याची सूचना केली होती.

‘एसजीपीडीए’लाही नियंत्रण मंडळाकडे अर्ज करण्यास सांगितले होते. मात्र, ‘एसजीपीडीए’ने अर्ज केला की नाही, याबाबत माहिती मिळालेली नाही. चार मांस विक्रेत्यांनी त्यांना पाठविलेल्या नोटिसांना आव्हान दिले आहे. त्यांनी प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे अर्ज केल्याचे कळते. अस्वच्छता व कचरा फेकण्यावरून त्यांना ज्या नोटिसा पाठवल्या व त्यांची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले, त्याचा या विक्रेत्यांनी निषेध केला आहे.

‘एटीपी’ प्लांटची आवश्‍यकता

हे मार्केट ‘एसजीपीडीए’च्या मालकीचे असल्याने या प्राधिकरणानेही तेथील व्यावसायिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. या सुविधांमध्ये ‘एटीपी’ प्लांटचा समावेश आहे. या प्लांटसाठी ‘एसजीपीडीए’ने अर्ज करणे आवश्यक असल्याचेही या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT