सावर्डे-मडगाव दुपदरी रेल्‍वेमार्गाची चाचणी Dainik Gomantak
गोवा

सावर्डे-मडगाव दुपदरी रेल्‍वेमार्गाची चाचणी

सकाळी रेल्वेची मोटर ट्रॉली आणि सायंकाळी प्रवासी रेल्वेची स्पीड ट्रायल घेण्‍यात आली.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून तिनईघाट ते वास्को रेल्वेस्थानकापर्यंत सुरू असलेले रेल्वे दुपदरीकरणाचे काम सावर्डे ते माजोर्डापर्यंत पूर्ण झाले आहे. आज रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सावर्डे ते मडगावपर्यंत रेल्वेमार्गाची चाचणी केली. सकाळी रेल्वेची मोटर ट्रॉली आणि सायंकाळी प्रवासी रेल्वेची स्पीड ट्रायल घेण्‍यात आली. हा चाचणी अहवाल दक्षिण-पश्चिम रेल्वेला सादर केल्यावर या रुळाची पुन्हा पाहणी करून पंधरा ते वीस दिवसांच्या आत हा मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या वतीने तिनईघाट ते वास्को रेल्वे स्थानकापर्यंत दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. माजोर्डा ते वास्कोपर्यंतच्‍या रेल्वे दुपदरीकरणाच्‍या कामाला नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात येत असल्यामुळे तसेच कुळे ते सावर्डेपर्यत काही भागात वनखात्याची परवानगी अद्याप न मिळाल्याने रेल्वे दुपदरीकरणाचे काम थांबले आहे. सावर्डे, चांदर ते माजोर्डापर्यंत उभारलेल्या रेल्वेमार्गाची लांबी 15. 64 किलोमीटर एवढी असून, या मार्गाची आज चाचणी करण्यात आली. ही चाचणी रेल्वे विकास निगम लिमिटेडचे सरव्यवस्थापक शशिभूषण साहू, रेल्‍वे सुरक्षा आयुक्त ए. के. राय, हुबळी रेल्‍वे विभागीय व्‍यवस्‍थापक अरविंद नालखेडे व अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सकाळी सावर्डे ते मडगावपर्यंत मोटर ट्रॉलीने चाचणी केली व संध्याकाळी या मार्गावर प्रवासी रेल्वे प्रतिघंटा 124 कि.मी. वेगाने नेऊन स्पीड ट्रायल घेतली. या रेल्‍वेमार्गावर प्रवाशांच्या दृष्टिकोनातून सुधारणा करण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने अहवाल तयार करून दक्षिण-पश्चिम रेल्वेला पाठविण्यात येणार आहे. अहवालानुसार काही सुधारणा करण्याची गरज असल्यास त्या केल्यावर या रेल्वेमार्गाची पुन्हा पाहणी करून पंधरा ते वीस दिवसांत हा मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT