road closed dainik gomantak
गोवा

Goa News : मडगावातील रिंगरोड रात्री वाहतुकीसाठी बंद ठेवा !

कचरा टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना

गोमन्तक डिजिटल टीम

फातोर्डा : आकेपासून पॉवर हाऊसकडे जाणाऱ्या रिंगरोडच्या बाजूला वारंवार कचऱ्याच्या राशी निर्माण होत आहेत. त्यामुळे दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हा रिंगरोड दररोज संध्याकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत बंद करण्यासाठी अधिसूचना जारी करण्याविषयी मुख्याधिकारी मॅन्युएल बार्रेटो यांनी विनंती केली आहे.

हा रस्ता आके येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयामागून पॉवर हाऊस जंक्शनकडे जाण्यासाठी बाह्य रस्ता आहे. सिने विशांतपासून पॉवर हाऊसकडे जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्यास या रस्त्याचा वापर अनेक वाहनचालक करतात. मात्र, रात्रीच्या वेळी काही वाहनचालक अंधाराचा फायदा घेऊन या ठिकाणी कचरा टाकतात. त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर साचले आहेत.

मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि मडगावचे मुख्याधिकारी बार्रेटो यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या संयुक्त बैठकीवेळी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. रिंगरोडच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांना पकडण्यासाठी पालिकेने यापूर्वी अनेकदा प्रयत्न केले होते. परंतु रस्त्याकडेला पथदीप नसल्याने अज्ञात व्यक्ती रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळेस कचरा टाकतात. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरली आहे.

सुशोभीकरणाच्या कामात अडथळे

या रिंगरोडच्या बाजूला नव्याने बांधण्यात येत असलेल्या वॉकिंग ट्रॅकच्या सुशोभीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे हाती घेतले आहे. परंतु लोकांकडून सतत कचरा टाकण्याच्या प्रकारामुळे या कामात अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT