Wanted | Crime Canva
गोवा

Margao Crime: 'मडगाव कटा'तील मुख्य सूत्रधाराची अटकेपूर्व जामीनासाठी तयारी? तिन्ही संशयितांची पोलिसांच्या हातावर तुरी

Margao Kidnapping Case: मडगावातील सोन्‍याचे व्‍यावसायिक कुणाल रायकर यांच्‍या अपहरणाचा प्रयत्‍न केल्‍याच्‍या घटनेला आज सहा दिवस उलटले तरी हा प्रयत्‍न केलेल्‍या तीन संशयितांपर्यंत पोचण्‍यास मडगाव पोलिस अपयशी ठरले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Raikar Kidnapping Case

मडगाव: मडगावातील सोन्‍याचे व्‍यावसायिक कुणाल रायकर यांच्‍या अपहरणाचा प्रयत्‍न केल्‍याच्‍या घटनेला आज सहा दिवस उलटले तरी हा प्रयत्‍न केलेल्‍या तीन संशयितांपर्यंत पोचण्‍यास मडगाव पोलिस अपयशी ठरले आहेत. या अपहरण कटातील मुख्‍य सूत्रधार संशयित रुबेन वेर्णेकर सध्‍या फरार असून आपल्‍याला अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी त्‍याने उच्‍च न्‍यायालयात जाण्‍याची तयारी चालविली असल्‍याची माहिती खास सूत्राकडून मिळाली.

रुबेन वेर्णेकर याने यापूर्वी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज दक्षिण गोव्‍याच्‍या अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश क्षमा जोशी यांनी फेटाळून लावला होता. या प्रकरणात पोलिसांकडून संशयिताला अटक होणार अशा आशयाची कुठलीही परिस्‍थिती न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिलेली नाही, असे म्‍हणत न्‍या. जोशी यांनी हा अर्ज निकाली २५ ऑक्‍टोबर रोजी निकाली काढला होता. यानंतर मडगाव पोलिसांनी त्‍याचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न चालू केला आहे, एवढेच मडगाव पोलिस सांगत आहेत.

आके-मडगाव येथील बेबी ब्‍लॉझम या शाळेत शिकणाऱ्या आपल्‍या मुलाला शाळेत पोचवून परत येताना काल सकाळी रायकर यांचा अपहरणाचा प्रयत्‍न झाला होता. ३ अज्ञात अपहरण करणाऱ्यांनी बंदुकीचा धाक दाखवून त्‍याला बरोबर आणलेल्‍या गाडीत कोंबण्‍याचा प्रयत्‍न केला होता. मात्र त्‍यावेळी रायकर यांनी झटापट केल्‍याने त्याच्या हातातली बंदुकीची मॅगझीन खाली पडली होती, त्‍यामुळे या अपहरणाचा प्रयत्‍न फसला होता.

यापूर्वी कुणाल आणि रुबेन यांच्‍यात एका दुकानाच्‍या खरेदीवरून वाद चालू होता. कुणालने रुबेनकडून तीन कोटी रुपये घेतले होते. त्‍याबदल्‍यात तो त्‍याला दुकान विकणार होता. पण हा सर्व व्‍यवहार फिसकटल्‍याने आपले पैसे परत घेण्‍यासाठी रुबेनने कुणालला यापूर्वी धमकीही दिली होती. त्‍यामुळे या अपहरणाच्‍या प्रयत्‍नात रुबेन याचाच हात असावा, अशी तक्रार कुणाल रायकर याने मडगाव पोलिसात केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

Asian Games Final IND vs PAK: सुवर्णपदकाच्या सामन्यात टीम इंडियाचा दबदबा! पाकिस्तानच्या खेळाडूंनी टाकल्या नांग्या, मिळवला दिमाखदार विजय

SCROLL FOR NEXT